pomegranate esakal
नाशिक

Nashik Unseasonal Rain: आर्द्रता वाढल्याने डाळिंबांना बसणार फटका; तेलकट डाग वाढीस पोषक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Unseasonal Rain : तालुक्यासह कसमादेत गेल्या दोन दिवसापासून बेमोसमी पाऊस होत आहे. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. पावसाबरोबर आर्द्रतायुक्त थंडी वाढली असून आर्द्रतेचे प्रमाण ७० टक्यांपेक्षा अधिक आहे. सध्याचे वातावरण डाळींबावरील तेलकट डागवाढीस पोषक आहे. वातावरणाचा परिणाम डाळिंब बागांवर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कसमादेत चाळीस हजार हेक्टरवर हस्त बहाराचे उत्पादन घेतले जात आहे. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी ताम्रयुक्त बुरशीजन्य फवारणी करणे गरजेचे आहे. शिवाय क्रॉफ्ट कव्हरचा वापर बागेत करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

दरम्यान कसमादेत बेमोसमी पावसाने कही खुशी कही गम असे वातावरण आहे. (Pomegranate will suffer due to increase in humidity nashik Unseasonal Rain news)

कसमादेत कांद्यानंतर सर्वाधिक डाळिंबाचे उत्पादन घेतले जात आहे. नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डाळिंबाने या भागाला सुबत्ता मिळवून दिली. डाळिंबावरील मर रोग व तेल्या रोगाचा सामना करत शेतकऱ्यांनी पीक जगविले आहे. मध्यंतरीच्या काळात रोगांवर अटकाव घालण्यात यश आले होते.

रोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने डाळिंबाचे क्षेत्र पुन्हा वाढले. गेल्या दोन वर्षापासून डाळिंबाचे भाव तेजीत आहे. सध्या उच्च प्रतीचा डाळिंब १५० ते १७० रुपये किलोने विकला जात आहे. भाव टिकून असल्याने डाळिंबाचे क्षेत्र वाढत आहे. कसमादेत ५५ ते ६० हजार एकरवर डाळिंब बागा विस्तारल्या आहेत.

मृगबहार अखेरच्या टप्प्यात आहे. यावर्षी मृग बहारातील डाळिंबाला चांगला भाव मिळाला. जवळपास चाळीस हजार एकरवर शेतकऱ्यांनी हस्त बहार धरला आहे. फळ सेट होऊन प्राथमिक अवस्थेत आहे. बहार चांगल्या स्थितीत आहे, अशा परिस्थितीत अचानक वातावरणात बदल झाला.

तालुक्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. काही ठिकाणी गारा पडल्या. सध्या आद्रतायुक्त थंडी आहे. अंगाला झोंबणाऱ्या गार वाऱ्याने दळणवळणावर देखील परिणाम झाला आहे. सध्या हवेतील आर्द्रता ६५ ते ७० टक्क्यापेक्षा अधिक आहे.

डाळिंब बागांना सामान्यतः ५० टक्क्यांपर्यंत आर्द्रता योग्य असते. आर्द्रता मोठ्या प्रमाणावर वाढल्याने डाळिंबावरील तेलकट रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. शिवाय फळांच्या वाढीवर परिणाम होईल. बुरशीजन्य रोगांचा बागांवर प्रादुर्भाव होवू शकेल.

तापमान घसरल्याने हवेतील आर्द्रता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हस्त बहाराचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जात असून कसमादेतील अर्थव्यवस्थेला यातून चालना मिळणार आहे. सध्याची परिस्थिती निवळण्याची शेतकरी वाट पाहत आहेत. पाऊस काही प्रमाणात फायदेशीर ठरला आहे. हवेत वाढलेल्या आद्रतेमुळे फळ पिकांना बाधा पोहोचत असून फवारणीचा खर्च वाढणार आहे.

"बेमोसमी पाऊस व तापमान घसरल्याने आर्द्रता जवळपास दीड पटीने वाढली आहे. फळावरील तेलकट डाग व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात. ताम्रयुक्त बुरशीनाशकाची फवारणी करावी. बागेवर क्रॉफ्ट कव्हरचा वापर करावा. यामुळे बागेत उब तयार होऊन गारपिटीपासून फळांचे रक्षण होऊन शकेल. क्रॉफ्ट कव्हरसाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अनुदान दिले जात आहे. वातावरण सामान्य होईपर्यंत सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी बागेची काळजी घ्यावी." - सचिन हिरे, प्रभारी अधिकारी, डाळिंब संशोधन, तंत्रज्ञान प्रसार केंद्र, लखमापूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: निवडणुकीत महाराष्ट्रात पैशांचा पडतोय पाऊस; आतापर्यंत तब्बल 'इतके' कोटी जप्त

दुबई ट्रिप, कार, फ्लॅट अन्... बाबा सिद्दिकींना मारणाऱ्यांना काय आमिष दिलं होतं? तपासात धक्कादायक माहिती समोर

स्मोकिंग सोडल्यावर वजन का वाढते? ते कसे कंट्रोल करावे? कारणासह उपाय जाणून घ्या

Rinku Rajguru: अभिनेत्री रिंकू राजगुरूचा शनिदर्शनात ‘शॉर्टकट’; चौथऱ्याखालूनच हात जोडले

Out or not out? चिडके कुठचे! ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाला नाबाद दिल्याने भारतीय खेळाडूंना धक्का, Video Viral

SCROLL FOR NEXT