possibility of chandrashekhar bawankule have have to make big compromise in alliance nashik news 
नाशिक

Chandrashekhar Bawankule News : नाशिकसाठी बावनकुळेंचीच कसोटी! युतीत मोठी तडजोड करावी लागण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

Chandrashekhar Bawankule News : लोकसभेच्या निवडणुकी दृष्टीपथात असल्याने भारतीय जनता पक्षातर्फे राज्यात निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून लोकसभेसाठी नाशिकची खेळपट्टी तयार करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे सोमवारी (ता.२४) नाशिक दौऱ्यावर येत आहे.

दरम्यान भाजप- शिवसेना युतीमध्ये नाशिकची जागा आता शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहे. जागावाटपाच्या समीकरणात ही जागा भाजपला आपल्याकडे खेचून घ्यावी लागेल, अर्थात त्यासाठी शिंदे गटाला चुचकारावे लागेल किंवा याबदल्यात इतर जागावेर भाजपला तडजोड करावी लागेल.

त्यामुळे नाशिकची जागा राखण्यासाठी आणि ती मिळविण्याप्रश्नी श्री. बावनकुळे यांचीच खरी कसोटी असणार आहे. (possibility of chandrashekhar bawankule have have to make big compromise in alliance nashik news)

लोकसभा निवडणुकीसाठी आठ ते नऊ महिन्याचा कालावधी असला तरी आतापासूनच सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. २०१९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती होती. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचे महत्त्वाचे शिलेदार बनले व राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती घेतली.

मात्र अवघ्या वर्षभराच्या कालावधीतच शिवसेनेत फूट पडली व एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन करून भाजपच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. निवडणूक आयोगानेही शिंदे यांच्या गटाला मान्यता देत शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह शिंदे यांच्या गटाकडे सोपविले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार यांचा गट नुकताच शिंदे-फडणवीस यांच्या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाला.

राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथापालत झाल्यानंतर आता सत्तेत असलेले पक्ष व गट आणि विरोधातील पक्ष व गट लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. त्यादृष्टीने भाजपने राज्यात प्रचाराचा धुराळा उडवण्यास सुरुवात केली आहे. महायुतीत जागा वाटपाचे सूत्र अद्याप ठरले नसले तरी भाजपने राज्यात ४५ लोकसभा व २०० विधानसभेच्या मतदारसंघांमध्ये निवडणुकीची तयारी केली आहे. त्याच अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा दौरा होत असल्याचे बोलले जात आहे.

पाटील वगळता इच्छुकांची चुप्पी

नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपतर्फे लढविली जाईल. सर्वेक्षणाचे अहवाल देखील त्याच अनुषंगाने अंगुली निर्देश करत आहे. मात्र महापालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील वगळता इच्छुकांनी निवडणूक लढविण्याबाबत उघड भूमिका घेतलेली नाही. पक्ष संघटनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी पाटील यांना शब्द दिल्याने लोकसभेसाठी उघडपणे तयारी सुरू केल्याचे सांगितले जाते

नाशिक शहरातील पूर्व, पश्चिम, मध्य व देवळाली या मतदारसंघासह इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, सिन्नर व नाशिक तालुका भागात गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून ते काम करत आहे. या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे जाळे त्यांनी निर्माण केले आहे.

भाजपतर्फे झालेल्या सर्वेक्षणात पाटील यांच्या देखील नावाचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास महाविकास आघाडी कडून देखील पाटील यांना उमेदवारी देण्याची तयारी झाल्याचे बोलले जात आहे.

असा आहे बावनकुळे यांचा दौरा

श्री. बावनकुळे लोकसभा महाविजय अभियानांतर्गत सोमवारी (ता.२५) नाशिक दौऱ्यावर येत आहे. दुपारी साडेबाराला ‘घर चलो अभियानात सहभाग व नागरिकांशी सुसंवाद. दुपारी अडीचला सिडकोतील माऊली लॉन्स येथे कामगार मेळावा होणार आहे. त्यानंतर गंगापूर रोड येथील प्रसाद मंगल कार्यालय येथे तीन विधानसभेतील प्रत्येकी १०० याप्रमाणे ३०० बूथ वॉरिअर्सच्या बैठकीला संबोधित करतील. लोकसभा महाविजय अभियानाच्या संकल्पना सादर करणार. सायंकाळी पाचला सातपूर येथे ‘घर घर चलो’ अभियानांतर्गत नागरिकांशी सुसंवाद. सायंकाळी नाशिक पूर्व विधानसभेतील परिसरातील प्रमुख व प्रभावी व्यक्तींची भेट घेतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT