possibility of soil erosion from hill at Saptashrungi Gad Nashik news esakal
नाशिक

Saptashrungi Devi Gad : सप्तशृंग गडावरील संभाव्य धोका टळावा; मंदिर ट्रस्ट, ग्रामपंचायतीचे प्रशासनाला पत्र

दिगंबर पाटोळे

Saptashrungi Devi Gad : देशातील एकमेव स्वयंभू आद्य शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावरील काही भाग धोकादायक झालेला असून येथे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सह्याद्री पर्वताच्या पूर्व- पश्‍चिम पर्वतरांगेत डोंगर पठारावर समुद्रसपाटीपासून सुमारे एक हजार ४८० मीटर उंचीवर निसर्गसौंदर्य व भक्तिभावाने भारावलेला सप्तशृंगी गड (वणी) सात शिखरांचे (शृंगे) स्थान म्हणून ओळखले जाते. (possibility of soil erosion from hill at Saptashrungi Gad Nashik news)

सप्तशृंग गड हे आंबेगाव तालुक्यातील माळीण येथील दरड कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर अति संवेदनशील धार्मिक व पर्यटनस्थळ म्हणून गणले जाऊ लागले.

गडावर देवीचे मंदिर डोंगराच्या कपारीत असल्याने पावसाळ्यात डोंगर कपारीतील धोकादायक दरडी कोसळण्याची शक्‍यता असते. यामुळे सरकारने आधुनिक पद्धतीने संरक्षित जाळी (गर्डर) बसविण्याचे काम केले. दरड कोसळण्याचा संभाव्य धोका काहीसा टळला असला तरी ही उपाययोजना पुरेशी नसल्याचे दिसत आहे.

मंदिर पायऱ्यांवरील राम टप्पा, कासव टप्पा व रोप वे मार्गाचा परिसर ते पहिल्या पायरी पर्यंतच्या भाग हा ठिसूळ दगड, मुरूमयुक्त असल्याने या भागातील माती पावसाळ्यात खाली वाहून येते. परिसरात खालच्या बाजूला सुमारे चार हजार लोकसंख्येची नागरी वस्ती आहे.

कळवण वनपरिक्षे कार्यालयास पत्र

धोकादायक भागातून पावसाळ्यात मुरूम मातीचा भाग खचून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सदरचा भाग हा वन विभागाच्या अखत्यारीत असल्याने याबाबत सप्तशृंगी गड ग्रामपंचायतीतर्फे सरपंच रमेश पवार यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपरिक्षेत्र कार्यालय कळवण यांना वीस दिवसांपूर्वी पत्र दिले आहे.

यात भगवती मंदिरात जाणे येणे साठी असणाऱ्या पायरीच्या आजूबाजूचा डोंगराळ भाग असल्याने, सदर परिसरात माती साचलेली आहे. त्यामुळे सावध व सतर्क राहाणे गरजेचे असून, माळीण सारखी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दगडी बांध किंवा संरक्षण भिंतीचे काम होणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचाही पाठपुरावा

सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टनेही मागील काही वर्षात वनविभाग व अन्य विभागाकडे संभाव्य धोकादायक भागाचे सर्वेक्षण करून उपाययोजना करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे. याबाबत वनविभागाने संभाव्य दुर्घटनेची वाट न बघता कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच, गडावरील प्रदक्षिणा मार्गावरही दरड पडण्याच्या घटना घडत असतात. प्रदक्षिणा मार्ग तीन किलोमीटरचा असून या मार्गावरून जात असताना दगड पडून भाविकांचा मृत्यू झाला आहे. तदपासून हा मार्ग ट्रस्टने बंद केलेला आहे.

जाळी बसविणे आवश्यक

नांदुरी - सप्तशृंग गड या घाट रस्त्यावरील दरम्यान गणपती टप्पा परिसरात पावसाळ्यात छोटे-मोठे दरड पडण्याच्या घटना घडत असतात. दरड प्रतिबंधासाठी मंदिर कळसाप्रमाणे प्रदक्षिणा मार्ग व घाट रस्त्यावरील धोकादायक भागाला लोखंडी जाळी बसविणे अत्यावश्यक झाले आहे.

"कासव टप्पा ते पहिली पायरी दरम्यानचा परिसर मातीयुक्त आहे. पावसाळ्यात येथून माती वाहून येत असते. त्यामुळे माती दरडचा मलबा वाहून दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने वनविभागाकडे याबाबत ग्रामपंचायतीतर्फे उपाययोजना करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे."-संदीप बेनके, ग्रामपंचायत सदस्य, सप्तशृंग गड

"दोन वर्षांपूर्वी या भागातून माती वाहून आल्याची घटना घडली होती. याबाबत ट्रस्टने संबंधित विभागाकडे उपाययोजना करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे. ट्रस्टने या भागातील मातीची धूप रोखण्याच्या दृष्टीने वृक्षारोपणही केले आहे."-भूषणराज तळेकर, विश्वस्त सप्तशृंग गड

"उप वन अभियंता वनवृत्त नाशिक यांना ग्रामपंचायतीच्या पत्राच्या संदर्भान्वये सदर क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजना सुचवाव्यात. सदर कामांची अंदाजपत्रके तयार करण्यासाठी पत्र दिले आहे."-दीपावली गायकवाड, वनपरीक्षेत्र अधिकारी, कळवण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT