Indian Postal Department latest marathi news esakal
नाशिक

वॉटरप्रूफ पाकिटाने भावापर्यंत सुरक्षित पोचणार राखी : टपाल विभाग

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : रक्षाबंधनाचे (Raksha bandhan) औचित्य साधत टपाल विभागाने (Postal Department) विशेष पाकिटांची निर्मिती केली असून त्याद्वारे आता बहिणी आपल्या लाडक्या भावाला राख्या (Rakhi) पाठवू शकणार आहे. भाऊ बहिणीचे अतूट नाते अधिक दृढ करण्यासाठी टपाल खात्याने या पाकिटाची निर्मिती करण्यात आली आहे.

केवळ दहा रूपयांत मिळणाऱ्या या पाकिटाद्वारे संबंधित स्पीड पोस्टाद्वारे व्यवस्था केली आहे. त्याद्वारे प्रत्येक भावापर्यंत बहिणीचे राखी वेळेवर पोचविण्याचे उद्दिष्ट टपाल विभागाने ठेवले आहे. (postal department has created special packets to celebrate Raksha Bandhan nashik latest marathi news)

नाशिक विभागाचे प्रवर डाक अधिक्षक मोहन अहिरराव यांनी मंगळवारी (ता. २६) याबाबत माहिती दिली. प्रत्येक वर्षी राखीच्या पाकिटांसाठी मागणी वाढत असल्याचे सांगितले. स्पीड पोस्टाद्वारे देशांसह परदेशातही वेळेवर राखी पाठविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे खात्यातर्फेच पाकिटावर राखीचा उल्लेख करण्यात आल्याने त्याची वर्गीकरणही सोपे होणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय विभागातील सर्वच टपाल कार्यालयांना राखीच्या वेळेवर वाटपाबाबत सूचना करण्यात आल्याचे श्री. अहिरराव यांनी सांगितले. जिल्ह्यासह शहरातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Latest Marathi News Updates live : लाडक्या बहिणींना आता महिन्याला 2100 रुपये मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT