potholes in nimani bus stand latest rain news esakal
नाशिक

Nashik : निमाणी बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : येथील निमाणी बसस्थानक दुर्लक्षित झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे खड्ड्यांचे (Potholes) साम्राज्य पसरले आहे असून, साठलेल्या पाण्याचे तळे झाले आहेत. २०१०- ११ मध्ये माजी खासदार समीर भुजबळ यांच्या विकास निधीतून निमाणी बस स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले होते.

यात १३५ फूट लांब आणि ३५ फूट रुंद आकाराचे नऊ अद्ययावत फलाट, मध्यवर्ती वाहतूक नियंत्रण कक्ष, प्रवाशांसाठी आरामदायी बैठक व्यवस्था, वाहन चालकांसाठी विश्रामगृह, बुक स्टॉल, कॅन्टीन, संरक्षक भिंत, अंतर्गत रस्त्याची सुविधा करण्यात आली होती. (potholes at Nimani Bus Stand due to heav rain nashik latest rain marathi news)

पंचवटीतील निमाणी बस स्थानकाहून सातपूर, अंबड एमआयडीसी येथे जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग असते. तसेच पंचवटी हे शैक्षणिक हबदेखील आहे. यामुळे शाळा, कॉलेजला जाणारी विद्यार्थ्यांची ये- जा असते. या ठिकाणाहून सिटीलिंक बस लागतात. गेल्या चार पाच दिवसांपासून संततधार सुरू होती. यामुळे या बस स्थानकाची सद्यःस्थितीत कमालीची दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे ही दुरवस्था ही गेल्या तीन- चार वर्षापासून आहे. खड्ड्यांचे साम्राज्य दिवसागणिक वाढत आहे. निमाणी बस स्थानकात ६ ते १२ इंच खोल, १५-२० फूट व्यासाचे अनेक खड्डे ३-४ वर्षांपासून पडले आहेत. आता तर खड्डे एवढे वाढले आहेत, की तिथून येणे जाणे शक्यच नाही. पावसात अनेक लोक पाय घसरून पडतात. यामुळे येणारी जाणारी प्रत्येक बस जोरदार आदळते.

आम आदमी पक्षाचे आंदोलन

या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून खड्ड्यात साचलेल्या पाण्यात आम आदमी पक्षातर्फे कागदाच्या होड्या सोडण्यात आल्या होत्या. निष्क्रिय प्रशासनाचा जाहीर निषेध केला होता. या वेळी जितेंद्र भावे, राजेंद्र गायधनी, जगदीश भापकर, ललित चौगुले, सौरभ भारद्वाज आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT