Sinnar Bazar Samiti : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेले आमदार माणिकराव कोकाटे व माजी आमदार राजाभाऊ वाजे-उदय सांगळे यांच्या गटात झालेली लढत तालुक्याचे राजकीय रागरंग दाखवणारी ठरली. या निवडणुकीचा निकाल सत्ताधारी कोकाटे गटासाठी अनपेक्षित राहिला आहे. मात्र वाजे-सांगळे गटासाठी वाढलेले संख्याबळ बेरजेच्या राजकारणात अपेक्षा उंचावणारे ठरले आहे. (Power split in front of Waje Kokate group due to election of same director sinnar market committee election nashik news)
दोन्ही गटांनी समान नऊ जागा जिंकल्यामुळे आता सभापती-उपसभापती पदाच्या माध्यमातून सत्ता हस्तगत करण्यासाठी सर्वांनाच चमत्काराची अपेक्षा आहे.
बाजार समितीत सत्ता स्थापनेसाठी निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी उभय गटांकडून विविध पर्यायांवर चाचणी केली जात असून अंतिम वेळी मात्र चिठ्ठीचा कौल मान्य करण्याची मानसिकता दाखवावी असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला जात आहे.
सिन्नर बाजार समितीत गेल्या तीन पंचवार्षिक कोकाटे यांची एक हाती सत्ता राहिली. गत निवडणुकीत तत्कालीन आमदार राजाभाऊ वाजे यांच्या गटाला बाजार समितीत शिरकाव करता आला.
काम झालं, मात्र सत्ताधारी कोकाटे गटाकडून विरोधक म्हणून निवडून आलेल्या संचालकांची कोणतीही दखल घेतली गेली नव्हती. यंदाच्या निवडणुकीत सत्ता मिळवायचीच असा चंग बांधत विरोधकांचा गट सुरवातीपासूनच सक्रिय झाला होता, त्यामुळेच निवडणुकीचे निकाल लागले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.
सहकारी संस्था गटात आमदार कोकाटे गटाचे पारडे जड असल्याची अटकळ सर्वांनीच बांधली होती. ग्रामपंचायत व वैयक्तिक गटात वाजे सांगळे गटाला झुकते माप राहील असा अंदाज होता. प्रत्यक्ष निवडणुकीचे निकाल लागले तेव्हा कोकाटेंच्या बाजार समितीतील एक हाती सत्तेला सुरुंग लावण्याचे आपले मनसुबे वाजे गटाने दाखवून दिले.
सहकारी संस्था अर्थात सोसायटी गटात अकरापैकी तीन जागा जिंकून घेत वाजे-सांगळे गटाने सत्ताधाऱ्यांना पहिला धक्का दिला. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे ग्रामपंचायत गटातील चार व व्यापारी गटातील दोन जागांवर वाजे गटाचे वर्चस्व राहिले. मापारी-तोलारी गटातील एक जागा केवळ नशीब बलवत्तर म्हणून कोकाटे गटाच्या पारड्यात पडली.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
या निवडणुकीत 'हम भी कम नही' हे वाजे-सांगळे गटाने दाखवून दिले आहे. खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत अवघ्या एका मताने आमदार कोकाटे गटाने सत्ता हस्तगत केली. आता बाजार समितीच्या निवडणुकीत एखादा चमत्कारच दोन्ही गटांना तारू शकेल.
आमदार कोकाटे सिन्नर पंचायत समितीचे सभापती असताना व बाळासाहेब वाघ यांची सभापतीपदी वर्णी लावत असताना बहुमतासाठी उमेदवारांची पळवा पळवी झाल्याचा इतिहास आहे.
त्याचीच पुनरावृत्ती आता होईल की काय याकडे तालुक्याचे लक्ष आहे. काठावर उत्तीर्ण झाल्यामुळे सत्तेसाठी कोकाटेंसोबतच वाजे गटाचे देखील हौसले बुलंद झाले आहेत.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
कोकाटेंपासून अनेक दुरावले
आमदार कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली सभापतिपद भूषविलेले विठ्ठल राजेभोसले, नामदेव शिंदे, अरुण वाघ, लक्ष्मण शेळके यांची साथ वाजे गटाला मिळाली. हे अनुभवी सहकारी एका मागोमाग कोकाटेंपासून दुरावले.
निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनीही काडीमोड घेतला. आमदारांचे बंधू भारत कोकाटे हे देखील कौटुंबिक कलहामुळे फारकत घेऊन वाजेच्या गोटात यापूर्वीच सामील झाले आहेत.
हे सर्वजण वाजे- सांगळे गटासाठी एकत्रित व्यूहरचना आखत होते. त्यांच्या दिमतीला निवडणुकांचा अनुभव असलेली चाणक्यांची कुमक होती. या सर्वांच्या जोरावरच कोकाटे यांच्या एक हाती सत्तेला सुरुंग लावण्यात विरोधकांना यश आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.