Prabhu Shri Ram Chandra chanting on Ramtirtha God Aarti with family by Uddhav Thackeray  esakal
नाशिक

Nashik Godavari Aarti: रामतिर्थावर दुमदुमला प्रभु श्रीरामचंद्रांचा जयघोष! उध्दव ठाकरेंकडून कुटूंबियांसह गोदा आरती

सियावर रामचंद्र कि जय चा नारा, फटाक्यांची आतषबाजी, टाळ्यांचा कडकडाट अशा भगवेमय वातावरणात गोदापरिसरात उत्साह संचारला.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भगवा कुर्ता, गळ्यात रुद्राक्षाची माळ शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या हुबेहुब पेहराव परिधान केलेल्या शिवसेनेच्या उबाठा गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते कुटूंबासह गोदा आरती करण्यात आली.

सियावर रामचंद्र कि जयचा नारा, फटाक्यांची आतषबाजी, टाळ्यांचा कडकडाट अशा भगवेमय वातावरणात गोदापरिसरात उत्साह संचारला. (Prabhu Shri Ram Chandra chanting on Ramtirtha God Aarti with family by Uddhav Thackeray Nashik news)

२२ जानेवारीच्या मुहूर्ताला अयोध्येत प्रभु श्रीराम मंदिराचे उदघाटन व मंदीराच्या गाभायात रामलल्ला मुर्तीची प्रतिष्ठापना झाली. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना उशिराने निमंत्रण देण्यात आले.

२३ जानेवारीला शिवसेनेचे महाअधिवेशन नाशिक मध्ये होत असल्याने या पार्श्‍वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी नाशिक मध्ये अयोध्येचा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला.

आज दुपारी विमानाने ठाकरे यांचे आगमन झाले. दुपारी भगुर येथील स्वा. विनायक दामोदर सावरकर स्मारकाला भेट दिली. संध्याकाळी श्री काळाराम मंदिरात त्यांनी कुटूंबासह दर्शन घेत आरती केली.

पत्नी रश्‍मी ठाकरे, मुलगा आदित्य व तेजस यांच्या हस्ते गोदापुजन झाले. त्यानंतर ठाकरे कुटूंबियांच्या हस्ते गोदा आरती झाली. ठाकरे यांचे गोदाघाटावर आगमन झाले त्यावेळी ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

रामकुंड व परिसरात मोठी गर्दी झाली. ठाकरे कुटूंबियांचे नागरिकांनी जोरदार स्वागत केले. सियावर रामचंद्र कि जय, पवनपुत्र हनुमान कि जय, गंगा गोदावरी माता कि जय तसेच शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. फटाक्यांची आतषबाजी, नदी पात्रात सोडलेल्या दिव्यांमुळे नयनरम्य वातावरण दिसतं होते.

विरोधी पक्षनेते अंबादास दानेव, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, राजन विचारे, अरविंद सावंत, माजी मंत्री दिवाकर रावते, अजय चौधरी, सुषमा अंधारे आदी प्रमुख नेते उपस्थित होते. सतीश शुक्ल, भालचंद्र शास्री शौचे, वैभव बेळे, अतुल गायधनी, रविंद्र देव, अमित पंचभैये, प्रमोद देव यांनी पौराहित्य केले.

पंचवटीत हाेर्डिंग्ज वाॅर

श्री काळाराम मंदीर परिसरात उबाठा गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे दर्शनासाठी येणार असल्याने शिवसेनेकडून होर्डींग्ज लावले परंतू मोक्याच्या जागांवर स्थानिक आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या कार्यकर्त्यांनी होर्डींग्ज लावल्याने शिवसेना नेत्यांना जागेचा शोध घ्यावा लागला.

अयोध्देतील राममंदीराचे उदघाटन व काळाराम मंदीरात उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आरतीच्या या धामधुमीत होर्डींग वॉर रंगल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मतदान केंद्रावरील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT