नाशिक : स्वयंपाकी म्हणून नियुक्तिपत्र देण्यासाठी दहा हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत रंगेहाथ सापडलेले कळवण प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रताप वडजे यांना प्रत्येक कंत्राटीपदाच्या नियुक्तीमागे लक्ष्मीदर्शनाची लालसा असल्याची चर्चा आदिवासी विभागात होऊ लागली आहे.
यापूर्वी देखील फेब्रुवारी महिन्यात आश्रमशाळेच्या कंत्राटी शिक्षक भरतीतदेखील त्यांनी गैरव्यवहार केल्याची तक्रार कळवण पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. यानंतर अनेक दिवस हे अधिकारी शाळेत गैरहजर होते. (Pratap Vadje bribe case greedy for bribe for appointment of contract staff Nashik Latest Marathi News)
स्वयंपाकीऐवजी सफाई कामगार म्हणून प्रकल्प कार्यालयाने काढलेल्या आदेशात सफाई कामगारऐवजी कामासाठी किंवा स्वयंपाकी पदनामाचे नव्याने आदेश काढण्यासाठी कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांना दहा हजारांची शौचालयात लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर आदिवासी कार्यालयांमध्ये त्यांच्या कारनाम्याची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
कळवण प्रकल्प कार्यालयांतर्गत चालविल्या जाणाऱ्या ४० शासकीय आश्रमशाळेत वर्ग चारची अनेक पदे रिक्त आहेत. नवीन शैक्षणिक वर्षात सदरची पदे ही कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली. या वेळी प्रत्येक आश्रमशाळेत सुमारे दोन ते तीन पदे ही याचपद्धतीने भरण्यात आली आहे. आस्थापना विभागचे प्रमुख असल्याने सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रताप वडजे यांच्याकडे अनेक अधिकार आहे. आपल्या याच पदाचा गैरवापर करत त्यांनी नवीन शैक्षणिक वर्षात अनेक कंत्राटी कर्मचारी यांना नियुक्तिपत्रे देताना लाचेची मागणी केल्याची चर्चा आहे.
एकंदरीत प्रकल्प अधिकारी यांचा आपल्या या अधिकाऱ्यावर वचक नसल्याने लाचखोर वडजे हे मोकाट सुटले होत. त्यांच्या एकाकी पद्धतीच्या कार्यप्रणालीमुळे त्यांच्या विरुद्ध अपर आयुक्त कार्यालयात अनेक तक्रारी देखील करण्यात आल्या होत्या. दोन वर्षांपूर्वीच त्यांना सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली होती. त्यानंतर नांदेड येथून त्यांची बदली होती. यापूर्वी देखील त्यांना सेवेतून दोन वेळा निलंबित करण्यात आलेले आहे.
कंत्राटी शिक्षण भरती प्रकरणी पोलिसांत तक्रार
कळवण प्रकल्प कार्यालयांतर्गत इंग्रजी माध्यमाच्या निवासी शासकीय आश्रमशाळेत २०२१-२२ आणि २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्त्वावर करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीत आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची चर्चा व त्याअनुषंगाने पोलिस ठाण्यात करण्यात आलेली तक्रार, यामुळे ही कंत्राटी शिक्षक भरती वादग्रस्त ठरली होती. यातही याच अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार करण्यात आली होती.
त्यानंतर अनेक दिवस हे अधिकारी आश्रमशाळेत गैरहजर होते. या प्रकारामुळे प्रकल्प अधिकारी यांच्याकडून ही भरती प्रक्रिया रद्द करत नव्याने भरती प्रक्रिया राबविली होती. मात्र त्यातही वडजे यांनी हस्तक्षेप करत आपल्या मर्जीतील उमेदवारांना नियुक्तिपत्र दिल्याची चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.