Pravin Tidme Join CM Shinde Gat esakal
नाशिक

सेनेच्या गडाला हादरा; प्रवीण तिदमे शिंदे गटात गेल्याने सिडकोत दिवसभर चर्चा

राजेंद्र बच्छाव

सिडको (जि. नाशिक) : सिडकोमधील शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण (बंदी) तिदमे यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश करून त्या गटाचे महानगरप्रमुख पदाची जबाबदारीदेखील स्वीकारल्याने शिवसेनेचा मजबूत गड सिडको गडाला पहिला हादरा बसल्याचे मानले जात आहे. दिवसभर सिडको भागात या प्रवेशाची जोरदार चर्चा होती. सिडको म्हणजे शिवसेना हे जुने समीकरण आहे. (Pravin Tidme joined CM Shinde group Nashik political Latest Marathi News)

सध्या तिदमे वगळता सेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या पत्नी हर्षा बडगुजर, रत्नमाला राणे, कल्पना चुंभळे, किरण गामने, सुदाम डेमसे, संगीता जाधव, दीपक दातीर, डी. जी. सूर्यवंशी, सुवर्णा मटाले, श्याम साबळे, चंद्रकांत खाडे आणि दिवंगत कल्पना पांडे असे नगरसेवक आहेत.

जाणकारांच्या मते शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाचा फैसला झाल्यानंतर सिडकोच्या या गडात अजून मोठी पडझड होणार आहे. दुसरीकडे सेनेच्या निष्ठावंत गटाने मात्र पुढची सोईस्कर ऍडजेस्टमेंट आणि कदाचित तिकिटासाठी स्पर्धेचा विचार करून तिदमे यांनी हा निर्णय घेतला असल्याचा दावा केला आहे.

मनपा निवडणुकीतील सुरवातीच्या निसटत्या पराभवानंतर त्यांनी सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येण्याचा गतवेळी पराक्रम केला आहे. शिवाजी चौक आणि लगतचा गोविंदनगर भाग अशा प्रभागातून ते इच्छुक आहेत. येथूनच सेनेचे बाबा गायकवाड यांनी मोठे उभे काम उभे केले आहे. तर शिवाजी चुंभळे यांच्यासोबत तिदमे यांचा नेहमीच संघर्ष राहिला आहे.

यानंतर चुंभळे आणि त्यांचे पुत्र अजिंक्य हे तिदमेंबाबत काय भूमिका घेतात, हेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र भाजपचे इतर इच्छुकांना हा प्रवेश किती रुचेल हेदेखील सांगणे अवघड आहे. एखाद्या दुसऱ्या नगरसेवकाने सेना सोडली म्हणजे सिडकोचा गड हलला अशी सुतराम शक्यता नसल्याचे निष्ठावंत शिवसैनिकांनी सांगत त्यांच्याऐवजी आता दुसरे नवे नेतृत्व पुढे येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

‘मुन्सिपल’ अध्यक्षपदावरून हकालपट्टी

नाशिक : नाशिक म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांची संघटनेच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी झाली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री बबन घोलप यांनी यासंदर्भात पत्रक काढले. त्यांनी पदाचा गैरवापर केल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे घोलप यांनी पत्रात म्हटले आहे.

"बंटी तिदमे हे कडवट शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी घेतलेला हा निर्णय दुर्दैवी आहे. तो का घेतला याचे खरं कारण तेच सांगू शकतील. मात्र त्यांचे वय बघता त्यांना अनेक वर्ष राजकारणात खऱ्या अर्थाने विविध संधी आणि न्याय केवळ उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखालीच मिळाला असता हेदेखील वास्तव आहे. त्यांनी दिल्या घरी सुखी राहावे, या शुभेच्छा."

- सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख

"हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना प्रेरित असलेले हिंदुत्व पुढे नेण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. सेनेने केलेल्या अभद्र युतीमुळे सर्वत्र मुस्कटदाबी झाली होती. हेदेखील एक कारण आहे. पुढील काळात सेनेचे अनेक पदाधिकारी आणि नगरसेवकदेखील सोबत येणार आहेत. सिडकोमध्ये सर्वांना सोबत घेऊन खऱ्या शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी काम करणार आहे."

- प्रवीण तिदमे, महानगरप्रमुख, शिंदे गट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT