Blown roof of gym at Komalwadi. esakal
नाशिक

Pre Monsoon Rain Damage: कोमलवाडीत व्यायामशाळा इमारतीचे पत्र्यांचे छप्पर उडाले

सकाळ वृत्तसेवा

Pre Monsoon Rain Damage : तालुक्यातील कोमलवाडी येथे गोसावी मळा परिसरात दोन महिन्यांपूर्वी बांधकाम पूर्ण झालेल्या व उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या व्यायामशाळेचे लोखंडी पत्र्याचे छप्पर रविवारी (ता. ४) दुपारी वादळाने उडाले.

या इमारतीच्या बांधकामाबाबत सुरवातीपासूनच ग्रामस्थांकडून संशय व्यक्त करण्यात आला होता. दोन आठवड्यांपूर्वी रंगरंगोटी झाल्यानंतर भिंतीला दिसणारे तडे बुजविण्याचे काम करण्यात आले होते. मात्र, अचानक आलेल्या वादळामुळे या कामाची गुणवत्ता उघड झाल्याची चर्चा आहे. (Pre Monsoon Rain Damage Sheet roof of gymnasium building blown off in Komalwad nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

गोसावी मळ्यात आमदार माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून व्यायामशाळा इमारत बांधकामासाठी सहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. हे बांधकाम पूर्ण होऊन इमारतीला रंगरंगोटी करण्यात आली होती व इमारत उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत होती.

रविवारी आलेल्या वादळात व्यायामशाळेच्या पत्र्याचे छप्पर उडून बाजूलाच दोनशे फुटांवर पडले. बांधकाम करतेवेळी गुणवत्ता लपवलेल्या भिंतीला देखील तडे गेल्याचे सांगण्यात आले.

याच व्यायामशाळेशेजारी मागील पाच ते सात वर्षांपासून बांधलेल्या कांदा साठवणुकीच्या चाळी आहेत. वादळात त्या सुरक्षित राहिल्या. तर नवीन बांधकाम असलेल्या व्यायामशाळेचे मात्र पत्रे उडाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT