karla Bagh was destroyed by the storm & fallen hail esakal
नाशिक

Pre-Monsoon Rain : मान्सूनपूर्व पावसाने कारल्याची बाग भुईसपाट; उत्तरपूर्व भागात गारासह वादळी पाऊस

सकाळ वृत्तसेवा

Pre-Monsoon Rain : उन्हाळ्यात भाजीपाल्याला भाव मिळतो, दोन पैसे हातात राहतील या आशेने विखरणी येथील बापूसाहेब विठ्ठलराव शेलार यांनी एक एकर कारल्याची बाग लावली होती. ऐन फळ येण्याच्या व उत्पन्न मिळण्याच्या काळातच वादळ व पावसाने संपूर्ण बाग भुईसपाट झाली आहे.

पाच महिने जिवापाड जपलेले पीक ऐन काढणीच्या काळातच नष्ट झाल्याने शेलार यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे सुमारे २ लाखाचे नुकसान झाले आहे. (pre monsoon rain in karla bag spoiled garden Stormy rain with hail over northeast areas nashik news)

मान्सूनपूर्व पावसाने तालुक्यातील उत्तर भागाला काल (ता.२९) चांगलेच झोडपून काढले. सुमारे एक तास वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.

काढलेला उन्हाळ कांदा ओला झाला असून मिरची, टोमॅटो लागवड केलेल्या शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात होताच नेहमीप्रमाणे वीजपुरवठा खंडित झाला होता.

अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांसोबत शेतकऱ्यांचीही तारांबळ उडाली. पावसामुळे नुकताच काढून ठेवलेला कांदा भिजला, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काल दाट लग्नतिथी असल्याने दुपारनंतर लग्नविधी सुरू असतानाच अचानक आलेल्या पावसाने वऱ्हाडी मंडळींची चांगलीच धावपळ झाल्याचे पहायला मिळाले.

दुपारी तीनच्या सुमारास मेघगर्जना आणि विजांचा कडकडात करत पावसाला सुरुवात झाली. सुरवातीला पावसाच्या हलक्या सरी आल्या; मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि जोरदार पावसाने गारांसह एक तास झोडपून काढले.

अचानक आलेल्या पावसामुळे खळ्यात, मळ्यात उघड्यावर नुकताच काढून ठेवलेला कांदा भिजला. अगोदरच कांद्याला भाव नाही, त्यात कांदा भिजल्याने खराब झाला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दोन महिन्यापासून तापमानात मोठी वाढ होऊन पारा ४१ ते ४२ अंशांपर्यंत गेला आहे, त्यामुळे जीव घेणाऱ्या उकाड्याने नागरिक हैराण झाले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तातडीने पंचनामे करावेत

विखरणी येथील बापूसाहेब शेलार यांनी एक एकर कारले बाग लावली होती. मेहनत करून व भांडवल गुंतवून त्यांनी बाग फुलविली होती.

कारले येऊन बाजारात चांगला भाव असल्याने दोन पैसे मिळण्याची अपेक्षा असतानाच वादळाने बाग पडल्याने सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याची माहिती बापू शेलार यांनी दिली आहे. महसूल व कृषी विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

तांदूळवाडी परिसरात गारपीट!

सकाळपासून उष्मा, दमट वातावरणाने सर्वांना असह्य करतानाच तालुक्यातील उत्तर भागात सोमवारी दुपारी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या. दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान व नंतर चारनंतर तालुक्यातील अनकाई, अनकुटे, धनकवाडी, तांदूळवाडी, आहेरवाडी आदी परिसरात मान्सूनपूर्व वळवाच्या पावसाने हजेरी लावली.

तांदूळवाडी फाटा, अनकुटे आदी ठिकाणी दहा ते पंधरा मिनिटे गारांचा पाऊस देखील झाला. गारा बोराच्या आकाराच्या होत्या, ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह हा पाऊस झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT