Preparation of pottery on occasion of Diwali nashik news  
नाशिक

Diwali Festival : पणती, बोळके तयारी करण्याची लगबग; दिवाळीनिमित्त कुंभार व्यावसायिकांची तयारी

सकाळ वृत्तसेवा

Diwali Festival : मंद, शांत ठेवणाऱ्या पणतीच्या प्रकाशाचा सण अर्थात दिवाळी पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीसाठी लागणारे पणती, बोळके, दिवे तयार करण्याची कुंभार व्यावसायिकांची गत पंधरा दिवसांपासून लगबग सुरू असून, यंदा नाशिकमधील व्यावसायिक लाखांवर पणती, बोळके, दिव्यांची निर्मिती करणार आहे.

दिवाळीत लाईटच्या लखलखाटात पणतीचे तेज आजही आकर्षित करते. दिवाळी जवळ आल्याने दररोज हजारो पणत्यांची निर्मिती कारागीर करीत आहे. नाशिकमधील निर्मिती करण्यात आलेले जिल्ह्यासह बोळके, पणत्यांना परराज्यातही मागणी आहे. (Preparation of pottery on occasion of Diwali nashik news)

नाशिकमधील कुंभार व्यावसायिक- कारागीर मागणीप्रमाणे परराज्यात मातीच्या वस्तू देत आहे. दिंडोरी, घोटी, त्र्यंबकेश्वर, मुंबईत नाशिकच्या बोळके, पणत्यांना मागणी आहे. तसेच, मध्य प्रदेशातील इंदूर,भोपाळ, गुजरातमधूनही मागणी वाढली आहे.

असे आहेत दर

बोळके- एक हजार नग - दोन हजार रुपये

पणती दीडशे रुपये शेकडा

दिवे चारशे रुपये शेकडा

कारागिरांचे नियोजन

दिवाळी जवळ आल्याने गत पंधरा दिवसांपासून कुंभार व्यावसायिक- कारागिरांची पणती, बोळके, दिवे तयार करण्याची लगबग आहे. पहाटे पाचपासून सुरू होत असलेले काम दुपारी पाचला थांबत आहे.

मात्र गत तीन-चार दिवसांपासून दोन-तीन तास भारनियमन होत असल्याने कामाला ब्रेक लागत आहे. व्यावसायिकांनी तासाला दीडशे बोळके, अडीचशे पणती, शंभर दिवे करण्याचे नियोजन असते. दिवाळीपर्यंत ६० हजार बोळके, चाळीस हजार पणती, २५ हजार दिवे होतील असा अंदाज श्री. कुंभार यांनी व्यक्त केला.

दिवाळी निमित्त पुजेसाठी बोळक्यांना मोठी मागणी असते.पारंपरिक पध्दतीने चाकाच्या साहाय्याने बोळके तयार करण्याची कुंभाराची सुरु असलेली लगबग

"दिवाळीसाठी बोळके, पणती, दिवे करण्याचे काम गत पंधरा दिवसांपासून सुरू आहे. नाशिकचे बोळके, दिवे, पणत्यांना परराज्यातून अधिक मागणी आहे. दिवसाचे व दिवाळीपर्यंत होणाऱ्या कामाचे नियोजन ठरलेले आहे." - कैलास कुंभार, व्यावसायिक

गोदाघाटावर ‘लक्ष्मी’ दाखल

घराघरांत चैतन्याचा दीप उजळवून टाकणाऱ्या दीपावलीसाठी अद्याप दहा बारा दिवस बाकी आहे. मात्र हिंदू धर्मियांत लक्ष्मी पूजनासाठी महत्त्वाच्या असलेल्या केरसुण्यांची (लक्ष्मी) गोदाघाटावर मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. येथून किरकोळ विक्रीसाठी या केरसुण्यांची घाऊक दरांत विक्री होते. दिवाळीला अद्याप अवकाश असल्याने तूर्त या विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा आहे.

बदलत्या काळात केरसुणीचे महत्त्व कमी झाले असलेतरी लक्ष्मीपूजनाला केरसुणीच्या पूजेला आजही महत्त्व आहे. त्यासाठी खास छोटी केरसुणी बनविली जाते. दरवर्षी दिवाळीपूर्वी मध्य प्रदेशातील इंदूर, सेंधवा, उज्जैन आदी भागातून केरसुणी शहरात दाखल होतात. सध्या गोदाघाटावरील म्हसोबा पटांगणावर मोठ्या प्रमाणावर लक्ष्मीरूपी केरसुण्या दाखल झाल्या आहेत. किरकोळ विक्रेते या ठिकाणाहून खरेदी करून शहराच्या विविध भागासह ग्रामीण भागात या केरसुण्यांची विक्री करतात.

या झाडू विक्रीतून जवळपास तीनशे ते साडेतीनशे लोकांना ताप्तुरत्या स्वरूपात का होईना रोजगार उपलब्ध होत असल्याचे गोदाघाटावर अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या सुभाष शेजवळ यांनी सांगितले. पूर्वी बांधीव शिराई हाताने तयार करणारे कारागीर होते, आता त्यांची जागा यंत्राने घेतली आहे. मध्यप्रदेशात शिराई उत्पादन करणारे अनेक कारखाने सुरू आहेत. शिराई बनविण्यासाठी पूर्वी शिंदीच्या झाडाचा वापर होत असे, आता खजुराच्या झाडापासून या केरसुण्या तयार होतात.

केरसुणीची जागा घेतली झाडूने

कालौघात केरसुण्यांची (शिराई) जागा यांत्रिक पद्धतीने बनविलेल्या झाडूने घेतली आहे. सत्तर- ऐंशीच्या दशकापर्यंत शहरात अनेक ठिकाणी बैठी घरे होती. तसेच काही जुन्या वाड्यांमध्येही फरशांएवजी जमीन शेणाने सारविली जात होती. अशा जमिनीवर झाडण्यासाठी केरसुणीचीच आवश्‍यकता होती.

कालांतराने जमिनीवर फरशा तर आता चकचकीत टाइल्स आल्या आहेत, त्यामुळे पूर्वीची केरसुणी कालबाह्य होऊन तिची जागा यंत्रापासून बनविलेल्या झाडूने घेतली. मात्र याही परिस्थितीत दिवाळीच्या पूजनासाठी तसेच ग्रामीण भागात अद्यापही मोठ्या प्रमाणावर केरसुणीच वापरली जाते.

केरसुणीचे प्रकार

कंगन, गजरा, गोंडा, साधी, कुच्चा (छोटी शिराई), दोन बंदवाली, तीन बंदवाली.

"या व्यवसायातून तीनशे ते साडेतीनशे लोकांना तात्पुरत्या स्वरूपात रोजगार प्राप्त होतो. डिझेलसह अन्य दरात वाढ झाल्याने सद्या गाडीभाडेही पाच हजार रुपयांनी वाढले आहे, त्यामुळे व्यवसायात कसरत करावी लागते." - सुभाष शेजवळ, होलसेल विक्रेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Latest Marathi News Updates live : लाडक्या बहिणींना आता महिन्याला 2100 रुपये मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT