marathi sahitya sammelan esakal
नाशिक

Marathi Sahitya Sammelan : ...तर अल्पावधीतच संमेलनाची तयारी

तुषार महाले

नाशिक : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत (marathi sahitya sammelan) ३१ जुलैपर्यंत निर्णय घेण्यासाठी साहित्य महामंडळाने अल्टिमेटम दिले होते. त्यानुसार शासकीय परवानगी मिळाल्यास अल्पावधीतच संमेलन उभे करण्याची तयारी असल्याचे, संयोजकांनी पत्राद्वारे कळविले असल्याचे समजते. दरम्यान, संमेलनाचे पदाधिकारी मंगळवारी (ता. ३) औरंगाबादला जाऊन मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील (kautikrao thale patil) यांची भेट घेणार आहेत.

पदाधिकारी घेणार महामंडळाच्या अध्यक्षांची भेट

नाशिकचे मराठी साहित्य संमेलन ऑफलाइन व्हावे, अशी इच्छा संमेलन समितीच्या समिती प्रमुखांच्या बैठकीत समोर आली आहे. कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता, आयोजक व महामंडळातील समन्वयाने हे संमेलन पुढे जावे, असे समिती प्रमुखांना वाटत असून, संमेलनाच्या तारखा निश्‍चित होत नाहीत, तोपर्यंत नियोजन करता येणार नाही. तसेच, संमेलन घ्यावयाचे असल्यास किती लोकांना परवानगी मिळेल, याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. संमेलन केव्हा होणार, हे माहिती नसताना हवेत गोळीबार केल्यासारखी आयोजनाबाबत चर्चा होत असल्याचे समिती प्रमुखांनी म्हटले आहे. नाशिकचे संमेलन ऑनलाइन घ्यावे का, याबाबतही विचारमंथन झाले होते. दरम्यान, साहित्य महामंडळाची बैठक गुरुवारी (ता. ८) होणार असून, त्यात संमेलनाबाबत निर्णय होऊन घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. श्री. ठाले-पाटील यांनी पत्रात संमेलनाच्या आयोजनाबाबत लोकहितवादी मंडळाला अनेक प्रश्‍न विचारले असून, संमेलन स्थगितीचा निर्णय प्रलंबित ठेवणे शक्य नाही, असेही पत्रात नमूद केले होते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता शासनाने पूर्णपणे निर्बंध शिथिल केलेले नाहीत. त्यामुळे नाशिकमधील संमेलनाबाबत अनिश्‍चितता आहे.

भूमिका करणार स्पष्ट

संमेलनाचे निमंत्रक असलेल्या लोकहितवादी मंडळाचे पदाधिकारी जयप्रकाश जातेगावकर, विश्‍वास ठाकूर, मुकुंद कुलकर्णी, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, विनायक रानडे आदींचे शिष्टमंडळ श्री. ठाले-पाटील यांची भेट घेणार आहे. संमेलनाबाबत नेमकी परिस्थिती, तसेच लोकहितवादी मंडळाची भूमिका याबाबत श्री. ठाले-पाटील यांना अवगत करणार आहेत. ऑक्टोबरअखेर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात संमेलन घेता येईल, असेही महामंडळाला सूचविले जाणार असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचा ३१६५१ मतांनी विजयी

Shweta Mahale Won Chikhli Assembly Election 2024: चिखली विधानसभेत काँग्रेस विरुद्धच्या थरारक सामन्यात भाजपच्या श्वेता महाले विजयी!

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Tanaji Sawant won Tuljapur Assembly Election Result 2024 : राणाजगजितसिंह पाटील यांच्या पदरी 'जीत', तुळजापूरमध्ये कमळ फुलले

Miraj Assembly Election 2024 Results : मिरज मतदारसंघात सुरेश खाडेंनी ठाकरे गटाच्या तानाजी सातपुतेंवर 44,706 मतांच्या फरकाने केली मात

SCROLL FOR NEXT