NMC Nashik News esakal
नाशिक

Nashik Crime: महिलांची फसवणूक प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तयारी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : महापालिकेच्या समाज कल्याण विभागातर्फे मोफत प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली दीडशे महिलांकडून आर्थिक स्वरूपात रोख रक्कम उकळण्यात आली,

त्यानंतर मात्र धनादेश स्वरूपात संबंधित महिलांना रकमेचा परतावा करण्यात आल्याने इंद्रजित टेक्निकल इन्स्टिट्यूट या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी एक प्रकारे गुन्हा कबूल केल्याने या सर्व प्रकरणाची चौकशी करून तथ्य आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तयारी महापालिकेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

त्याचबरोबर इंद्रजित टेक्निकल इन्स्टिट्यूट संस्थेचे देयके देखील थांबविले जाणार आहे. (Preparing to file criminal case in case of cheating women Nashik Crime)

महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने दरवर्षी महिलांना मोफत प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी अंदाज पत्रकात आर्थिक तरतूद देखील केली जाते. मागील वर्षी महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी वादग्रस्त इंद्रजित टेक्निकल इन्स्टिट्यूट या संस्थेची नियुक्ती करण्यात आली.

महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकीय राजवटी मध्ये अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाचा फायदा घेऊन या संस्थेच्या वतीने गंगुज फाउंडेशनच्या माध्यमातून प्रशिक्षणाबरोबरच महिलांना रोजगार मिळवून देणे व व्यवसायासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व हार्दिक राम उद्योगाच्या माध्यमातून पाच ते दहा लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आश्वासन देण्यात आले त्या पोटी महिलांकडून सहा ते अकरा हजार रुपयांची रक्कम देखील घेण्यात आली.

परंतु अनेक दिवस उलटनूही महिलांना कर्ज मिळाले ना रोजगार. त्यामुळे फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाल्याने महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते व शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची काही महिलांनी भेट घेऊन सदरचा प्रसार कानावर घातला.

त्यानंतर बडगुजर यांनी पोलिसांमध्ये तक्रार देण्याचे सूचना देण्याबरोबरच महिलांच्या पाठीमागे उभे राहण्याची भूमिका घेतली. त्याचबरोबर ज्या महिलांची फसवणूक झाली असेल त्या महिलांनी महापालिका किंवा महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील केले.

सदरच्या प्रकरणात आर्थिक फसवणूक प्रकरणी गोत्यात येत असल्याचे लक्षात आल्यानंतर इंद्रजित टेक्निकल इन्स्टिट्यूटचे कैलास सोनवणे व गंगुज फाउंडेशनचे ईश्वरमूर्ती बोडके यांनी महिलांचे पैसे तातडीने धनादेशाच्या माध्यमातून परत केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रकरणाची होणार चौकशी

महापालिकेच्या समाज कल्याण विभागाने या प्रकरणाचे गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. त्याचबरोबर संबंधित संस्थेचे देखील देयके रोखले जाणार आहे.

महिलांचे धनादेशाच्या माध्यमातून पैसे देण्यात आल्याने आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे.

अटी व शर्ती तपासणार

महिलांना प्रशिक्षण देताना बायोमेट्रिक हजेरी व सीसीटीव्ही कॅमेरात प्रशिक्षण देणे बंधनकारक करण्यात आले होते.

या संदर्भातील अटी व शर्तींचे उल्लंघन झाले आहे का, किंवा या अटी शर्ती यापूर्वी वगळण्यात आल्या आहेत का याची देखील तपासणी केली जाणार आहे अशी माहिती समाज कल्याण विभागाचे उपायुक्त प्रशांत पाटील यांनी दिली.

"महिलांची फसवणूक झाल्याचे ऐकण्यात आले असून समाज कल्याण विभागाचा विषय असल्याने या संदर्भात सखोल चौकशी करून कारवाई करणार आहे."

- प्रशांत पाटील, समाज कल्याण उपायुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT