Guides and Facilitators participating in taluka level training of Sulabhaks under School Preparatory Mission. esakal
नाशिक

Nashik News: नव्या वर्षात...शाळेतील पहिले पाऊल! दाखल पात्र बालकांसाठी येवला तालुक्यात शाळापूर्व तयारी अभियान

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा परिषद शासकीय शाळेमध्ये दाखल पात्र बालकांची संख्या वाढली आहे, हेच फलित यावर्षी देखील दिसून येईल.

बालकाची शाळा पूर्वतयारी करून घेण्यासाठीचा उपक्रम अत्यंत उपयोगाचा असून या उपक्रमाच्या माध्यमातून माता पालक, स्वयंसेवक, शिक्षक व अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने दाखल पात्र बालकांची जूनला दाखल होण्यापूर्वीच शाळा पूर्वतयारी करून घेण्यात येणार आहे अशी माहिती येथील पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रशांत गायकवाड यांनी दिली. (Preschool preparation campaign in Yeola taluka for enrolled eligible children Nashik News nashik news)

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे स्टार्स प्रकल्पांतर्गत शाळा पूर्वतयारी अभियान जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. पहिलीत दाखलपात्र बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियान संपूर्ण तालुक्यात राबविण्यात येणार आहे.

अभियानातर्गत सुलभकांचे तालुकास्तरीय प्रशिक्षण येथील एन्झोकेम विद्यालय येथे घेण्यात आले. या प्रशिक्षणातून केंद्रस्तरावर प्रशिक्षण देण्यासाठीचे तज्ज्ञ मार्गदर्शकाचे प्रशिक्षण घेण्यात आले.

प्रशिक्षणासाठी प्रत्येक तालुक्यातून विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, अंगणवाडी, विशेष शिक्षक, पर्यवेक्षिका, विषय साधन व्यक्ती यापैकीची केंद्रातून प्रत्येकी दोन प्रतिनिधी उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. गायकवाड व विस्तार अधिकारी सुनील मारवाडी उपस्थित होते.

जूनपासून विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश करण्यासाठी शाळापूर्व तयारी अभियान मार्च ते जून या कालावधीत दाखल पात्र बालकांसाठी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येत आहे.

अभियानाअंतर्गत प्रत्येक शाळेमध्ये दाखल पात्र बालके, मातापालक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक,पालक यांच्या मदतीने शाळा स्तरावर पहिला मेळावा आयोजित करण्यात येणार आहेत.

पहिल्या मेळाव्यानंतर माता पालकांच्या व स्वयंसेवकांच्या मदतीने बालकाची शाळापूर्व तयारी ५ ते ६ आठवडे करून घेण्यात येईल. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये दुसरा मेळावा घेऊन बालकांची शाळा पूर्व तयारी पूर्ण करून घेण्यात येईल. त्यानंतर बालक पहिलीमध्ये दाखल होईल.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

तालुकास्तरीय प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक शिक्षण विस्तार अधिकारी मारवाडी,अंगणवाडी पर्यवेक्षिका वंदना शिंपी,श्रीमती शिंदे,विषयतज्ञ राम कुलकर्णी,सीमा खालकर,विशेष शिक्षक प्रवीण मांडळकर, पुंडलिक गवांदे हे उपस्थित होते.प्रशिक्षणाचा समारोप प्रसंगी उदयकुमार कुऱ्हाडे व हनुमंत लांडगे हे उपस्थित होते.केंद्रप्रमुख रवींद्र शेळके यांनी आभार मानले.

काय असेल या अभियानात

मेळाव्यामध्ये बालकांची शाळा पूर्वतयारी पूर्ण करून घेत असताना बालकाकडून करून घ्यावयाच्या विविध कृतींची नोंद विकास पत्र या रिपोर्ट कार्ड मध्ये शाळा स्तरावर मेळाव्यामध्ये घेण्यात येईल.

मेळाव्यामध्ये बालकाच्या विकासाच्या दृष्टीने शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक भावनिक विकास, भाषा विकास, गणन पूर्व तयारी स्टॉलवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

पालकांना बालकाची पूर्वतयारी करून घेण्यासाठी शाळेतील पहिले पाऊल ही पुस्तिका व मातांच्या गटांकडून करून घ्यावयाच्या कृतीसाठी आयडिया कार्ड देऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT