नाशिक : भारतीय सैन्यदलातील जवान हेमंत यशवंत देवरे (वय ३५) यांना पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे निधन झाले. आज सकाळी अकराच्या सुमारास हजारोंच्या उपस्थितीत नाशिकच्या स्मशानभूमीत शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी ‘भारतमाता की जय’, ‘वीर जवान हेमंत देवरे अमर रहे’ आदी घोषणांनी स्मशानभूमीचा परिसर दणाणून गेला होता. पोलिस व लष्कराच्या जवानांनी हवेत फैरी झाडत हेमंत देवरे यांना आदरांजली अर्पण केली. (presence of thousands funeral of Jawan Hemant Deore in state pomp Nashik News)
लष्करी जवान हेमंत देवरे यांना पश्चिम बंगालमध्ये वीरमरण आल्यावर काल (ता.६) त्यांचे पार्थिव इंदिरानगर परिसरातील नागरेमळा येथे रात्री आणल्यावर कुटुंबियांसह नातलगांचा शोक अनावर झाला.
देवरे कुटुंब मुळचे नेर (जि. धुळे) येथील हे कुटुंब काही वर्षापासून नाशकात स्थायिक झाले होते. आज सकाळी नऊच्या सुमारास सजविलेल्या वाहनातून अंत्ययात्रा निघाली. तत्पूर्वी अंत्ययात्रेला प्रारंभ होण्यापूर्वी पारंपारिक आर्मी परेडद्वारे हेमंत देवरे यांना मानवंदना देण्यात आली.
साडेदहाच्या सुमारास शहिद देवरे यांचे पार्थिव स्मशानभूमीत आणण्यात आले. तत्पूर्वीच याठिकाणी लष्करी अधिकारी व जवान मोठा संख्येने उपस्थित होते.
स्मशानभूमीत हेमंत देवरे यांच्या चार वर्षाच्या चिमुरड्या वरदने आई, आत्या व लष्करी सेवेतून निवृत्त झालेल्या आजोबांसह वडीलांच्या स्मृतीचक्र अर्पण करताना उपस्थितांचे डोळे पाणावले.
‘भारत माता की जय’,‘शहिद हेमंत देवरे अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी लष्करी अधिकारी जवान यांच्यासह पोलिस दलातील कर्मचारी, तहसीलदार शोभा पुजारी, नगरसेविका पुष्पा आव्हाड, लेफ्ट. ओमकार कानडे, एसीपी शेखर देशमुख,आप्तस्वकिय, मित्रमंडळी असे हजारो नागरिक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.