Assistant Commissioner ananda Wagh, Jadhav & Gadakh esakal
नाशिक

Police Medal: सहायक आयुक्त वाघ यांना राष्ट्रपती पोलीस पदक; सहायक उपनिरीक्षक लभडे, जाधव, गडाख यांनाही पदक

सकाळ वृत्तसेवा

Police Medal : स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे सोमवारी (ता. १४) पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ७६ पोलिस अधिकारी, कर्मचारी या सन्मानीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

नाशिक पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त आनंदा वाघ, आयुक्तालयातील सहायक उपनिरीक्षक वाळू लभडे, नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील सहायक उपनिरीक्षक संजय जाधव, नाशिक ग्रामीणमधील सहायक उपनिरीक्षक शामराव गडाख यांना पोलीस सेवेतील गुणवत्ता पोलीस पदक जाहीर झाले आहे.

तर, गेल्या वर्षी नाशिकचे पोलीस आयुक्त व सध्या अमरावती येथील विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. (Presidents Police Medal to Assistant Commissioner ananda Wagh Medals given to Assistant Sub Inspectors Labhad Jadhav Gadakh nashik)

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपदी पोलीस पदक जाहीर करण्यात आले. यात महाराष्ट्रातील ७६ पोलीस अधिकारी व कर्मचार्यांचा समावेश आहे.

33 पोलीस शौर्य पदक व ३ जणांना प्रशंसनीय सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस पदक तर, ४० पोलीस अधिकारी-कर्मचार्यांना पोलीस गुणवत्ता पदक जाहीर झाले आहे.

नाशिक पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त आनंदा वाघ यांना पोलीस दलातील गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे.

याचप्रमाणे, शहर पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस उपनिरीक्षक वाळू लभडे, नाशिक ग्रामीण पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक शामराव गडाख, नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील सहायक उपनिरीक्षक संजय जाधव यांना पोलीस सेवेतील गुणवत्तापूर्ण पोलीस पदक जाहीर झाले आहेत.

त्याचप्रमाणे, होमगार्ड व नागरी संरक्षण दलात उल्लेखनीय कामगिरीबददल मालेगाव पथकाचे समादेशक अधिकारी अय्युब खान अहमद खान पठाण यांना राष्ट्रपदी पदक जाहीर झाले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यांना राष्ट्रपती पदक

नाशिक पोलीस आयुक्तालयात गेल्या वर्षी असलेले पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.

त्याचप्रमाणे, नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी राहिलेले व विद्यमान अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण साळुंखे, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनाही राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.

तसेच, नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी राहिलेले व विद्यमान मुंबईचे सहपोलीस आयुक्त प्रवीणकुमार पडवळ यांना पोलीस दलातील गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे.

डिटेक्शनमध्ये तरबेज अधिकारी

शहर आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त आनंदा वाघ यांची डिटेक्शनमध्ये तरबेज अधिकारी म्हणून पोलीस दलात ओळख आहे.

मूळ शिवडे (ता. सिन्नर) येथील आनंदा वाघ यांनी १९९३ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदी महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाले. गडचिरोलीत विशेष अभियान पथकात उल्लेखनीय कामगिरी बजाविल्यानंतर अहमदनगर, मुंबई रेल्वे पोलीस, नाशिकच्या राज्यगुप्ता वार्ता विभाग, बीडीडीएसमध्ये कर्तव्य बजावले. त्यानंतर, शहर पोलीस आयुक्तालयात मुंबई नाका, पंचवटी पोलीस ठाणे व नंतर शहर गुन्हेशाखेच्या युनिट १ व २ ची जबाबदारी सांभाळली.

सध्या नाशिकरोड विभागाचे सहायक आयुक्त असलेले वाघ यांनी पोलीस सेवेत विविध गुन्ह्यांची यशस्वी उकल केली आहे. यात नगर जिल्ह्यातील बहुचर्चित कोठेवाडीचा दरोडा गुन्ह्याचा तपास, तसेच नाशिकमधील मुथुट फायनान्स दरोडा व गेल्या वर्षीचा पाथर्डी फाटा येथील कंपनी मॅनेजरचा खून यासह विविध क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास करीत आरोपींना गजाआड केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Vidhansabha: गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्या महेश गायकवाडांची शिवसेनेतून हकालपट्टी

पुन्हा trump सरकार! कमला हॅरिस यांचा पराभव करत पुन्हा बनणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, बहुमताचा आकडा केला पार

Hot Water Side Effects :  आरोग्यासाठी चांगलं असलं तरी अशा लोकांनी कधीच पिऊ नये गरम पाणी, त्रास अधिक वाढेल

Devendra Fadnavis: राहुल गांधींच्या हातातील संविधान 'लाल' का? देवेंद्र फडणवीसांनी का घेतली शंका?

Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी

SCROLL FOR NEXT