पिंपळगाव बसवंत : झेंडूच्या फुलांना बाजारात चांगली मागणी असून, सध्या सुरू असलेल्या पितृपक्षात फुले चक्क १०० रुपये किलो दराने खरेदी केली जात असल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
मागील वर्षी झेंडूला चांगला दर मिळाल्याने पिंंपळगांवसह परिसरातील शेतकरी झेंडू पिकाकडे वळले असून, निफाड तालुक्यातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झेंडूचे उत्पादन घेतले जाते. झेंडूच्या जातीनुसार उत्पन्न घेतले जाते.
त्यानुसार त्याचे दरही ठरविले जातात. या वर्षी ज्या आशेने उत्पन्न चांगले घेतले आहे, त्याची पूर्तता दसऱ्याला चांगला दर मिळून पूर्ण होईल, अशी अशा शेतकऱ्यांना आहे. (Price of marigold flowers Satisfaction among farmers Selling at the rate of Rs 100 per kg in Pitrupaksha Nashik News
सध्या पितृपक्षातही झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असून, शेतकऱ्याला १०० किलोचा भाव मिळत आहेत. हे दर असेच कायम राहिल्यास दसऱ्याला शेतकऱ्यांना चांगला नफा मिळणार आहे.
पिंपळगावमध्ये तीन एकर क्षेत्रात येथील दिलीप देशमाने यांना झेंडूच्या फुलांचे आतापर्यंत सव्वालाख रुपयांच्या आसपास खर्च आला आहे.
झेंडूच्या फुलांपासून चार लाख रुपयांच्या आसपास उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली असून, नवरात्रोत्सव आणि दसऱ्यात चांगला नफा मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
"यंदा झेंडूला दर चांगला असून, फुलांवर कीड पडल्यामुळे औषधींचा खर्च होत आहे. झेंडूवर पांढरी माशी, मावा, तुडतुडे यामुळे थोड्याफार प्रमाणात उत्पन्नात घट होऊ शकते."
-दिलीप देशमाने, शेतकरी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.