Farmers protesting by pouring milk on the road to get milk price hike on Ghoti highway esakal
नाशिक

Nashik: गाईच्या दूधाला 50 रुपये लिटर भाव द्या; हरसूले येथे शिवसेना शिंदे गटाकडून रस्त्यावर दूध ओतून आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना जनावरे सांभाळणे अवघड झाले आहे. हिरव्या चाऱ्यासाठी अधिकची किंमत मोजावी लागत आहे. दुभत्या जनावरांसाठीच्या ढेप पेंड यासारख्या पूरक आहारांच्या किमतीत कृत्रिम वाढ झाली आहे.

यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, त्यांना दिलासा देण्यासाठी गाईच्या दूधाला किमान ५० रुपये लिटरप्रमाणे शासनाने हमीभाव निश्चित करावा, अशी मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाने केली आहे.

रविवारी (ता. १९) सकाळी शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी घोटी-सिन्नर महामार्गावर हरसूले येथे रस्ता रोको आंदोलन करत व रस्त्यावर दूध ओतून या मागणीकडे लक्ष वेधले. (Price Rs 50 per liter for cow milk In Harsule Shivsena Shinde faction poured milk on streets and protested Nashik)

शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. सिन्नर तालुक्यात दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण दूध व्यवसायावर अवलंबून आहे. दूधाला मिळणारा दर अतिशय कमी आहे.

दुधासाठीचा उत्पादन खर्च निघत नाही. दुभत्या जनावरांसाठी पिण्याचे पाणी, चारा विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दूध विक्रीतून मिळणारे उत्पादन आणि चारा, पाण्यासाठी होणारा खर्च यात मोठी तफावत आहे.

यामुळे शेतकऱ्यांनी जनावरे सांभाळणे अवघड बनल्यामुळे त्यांना बाजाराचा रस्ता दाखविला आहे. त्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी मजुरी करण्याची वेळ आली आहे.

सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत दिलासा देण्यासाठी गाईच्या दूधासाठी किमान ५० रुपये प्रतिलिटर दर निश्चित करावा, अशी मागणी शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी केली.

हरसूलचे माजी सरपंच रामचंद्र शिंदे, माजी उपसरपंच प्रकाश शिंदे, अशोक पवार, सोमनाथ शिंदे, विठ्ठल केदार, रवी शिंदे, रामदास केदार, सुरेश शिंदे, मुकुंद शिंदे, उत्तम शिंदे, छगन शिंदे, नामदेव शिंदे, सोमनाथ शिंदे, योगेश शिंदे, बाळू केदार, तानाजी शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. सिन्नरचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

"गाईच्या दूधाला २७ रुपये प्रतिलिटरपर्यंत भाव मिळतो. हेच दूध प्रक्रिया करून ४० ते ५० रुपये लिटर दराने विकले जाते. दुभत्या जनावरांचा चारा, औषधांचा खर्च न परवडणारा आहे. दुष्काळामुळे हिरवा चारा विकत घ्यावा लागतो. इतर पोषण आहाराच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चाच्या प्रमाणात शेतकऱ्यांना दूधाला किमान ५० रुपयांपर्यंत भाव मिळाला पाहिजे."-रामचंद्र शिंदे, माजी सरपंच, हरसूले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: “….तर तोंड दाखवणार नाही”; राज ठाकरेंचं मशिदीवरील भोंगे, रस्त्यावरील नमाजबाबत मोठं विधान

Sports Bulletin 7th November: रणजी ट्रॉफीचा दुसरा दिवस श्रेयस अय्यरने गाजवला ते महिला प्रीमिअर लिगची रिटेन लिस्ट जाहीर

Sharad Pawar: आमच्या शेतकऱ्याला मिळते ती थकबाकीदाराची पदवी; शरद पवारांनी व्यक्त केली खंत

Virat Kohli ने केली नव्या टीमची घोषणा, म्हणाला हा माझा नवा अध्याय...

CM Eknath Shinde : लाडक्या बहिणींसाठी जेलमध्ये जाऊ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT