Narendra Modi  esakal
नाशिक

PM Modi Nashik Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी दौरा, पुतळे, मंदिर, पुलांना विद्युत रोषणाई

नदीकाठच्या प्रमुख मंदिरांची स्वच्छता व त्यावर विद्युत रोषणाई करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिल्या.

सकाळ वृत्तसेवा

PM Modi Nashik Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा दोन दिवसांवर आला असताना महापालिकेकडून त्यांचे आगमन होत असलेल्या मार्गाची डागडुजी, तसेच शहरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.

नदीकाठच्या प्रमुख मंदिरांची स्वच्छता व त्यावर विद्युत रोषणाई करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिल्या. (Prime Minister Narendra Modi tour statues temples bridge lighting in nashik news )

राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्‍घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी नाशिक शहर सजविले जात आहे. पंतप्रधान मोदी ज्या मार्गाने ये-जा करतील तो मार्ग स्वच्छ व रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त करंजकर यांनी विभागप्रमुखांना कामाचे वाटप करून दिले आहे.

शहरातील प्रमुख रस्ते, चौकांची साफसफाई करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या सूचना घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिल्या. त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करण्याची ग्वाही दिली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील प्रमुख रस्त्यांवर स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. रस्ता दुभाजक, वाहतूक बेटे धुतली जात आहे.

वाहतूक बेटांवर रंगरंगोटी करण्याबरोबरच दुभाजक व चौकांचे देखील सुशोभीकरण केले जात आहे. कार्यक्रमाकडे जाणारे सर्व रस्ते चकचकीत केले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा उद्यान व सहा विभागांच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. पंचवटी विभागातील रस्त्यांवरील अतिक्रमणे व कार्यक्रम होत असलेल्या स्थळाच्या परिसरातील अतिक्रमणे तातडीने हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून देण्याचे निर्देश अतिक्रमण निर्मूलन विभागाला देण्यात आले आहेत. शहरातील उद्याने, जादुई ट्रॅक येथे कमानी उभारण्याची जबाबदारी उद्यान व कर विभागाकडे देण्यात आली आहे.

पुतळे व पुलांना विद्युत रोषणाई

निलगिरी बाग, तपोवन यादरम्यान पंतप्रधान मोदी ‘रोड-शो’ करणार आहेत. हा एक किलोमीटरचा रस्ता फुलांच्या माळांनी सजविणला जाणार आहे. रस्त्याच्या दुभाजकावरही फुलांच्या माळा लावल्या जाणार आहेत. ‘रोड-शो’साठी लेझीम पथक, ढोल पथक व मार्गाने खेळ आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरातील महापुरुषांचे पुतळे स्वच्छ करून विद्युत रोषणाई केली जाणार आहे.

गोदावरी नदीवरील सर्व पुलांना विद्युत रोषणाई केली जाणार आहे. सिटीलिंक कंपनीच्या वतीने बसवर तसे महापालिकेच्या वाहनांवर कार्यक्रमाची जाहिरात केली जाणार आहे. शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना पशुसंवर्धन विभागाला देण्यात आल्या आहेत. रामतीर्थ, पंचवटी, तपोवन आदी रस्त्यांवर फिरणाऱ्या भिकाऱ्यांना बेघर निवारा केंद्रात स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT