Collectors Office esakal
नाशिक

New Education Policy: नवीन शैक्षणिक धोरणाचे परिणाम सकारात्मक; प्राचार्य ओलावत

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची तीन वर्षे

सकाळ वृत्तसेवा

New Education Policy : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा तीन वर्षांचा प्रतिसाद सकारात्मक असून, पारंपरिक शिक्षणातील घोकंपट्टीऐवजी सृजनात्मकता आणि विद्यार्थ्यातील सुप्त क्षमतांना वाव दिसू लागला आहे.

यंदापासून बालवाटिका परिचय उपक्रमामुळे तीन वर्षांपासून मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करणे शक्य होणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य देवेंद्रकुमार ओलावत यांनी केले. (Principal Olawat statement on results of new education policy positive nashik news)

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात केंद्रीय विद्यालय संघटनच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२०च्या आज तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्राचार्य राजेशकुमार, विमल श्रीनिवास, सुनील परदेशी, बाळासाहेब लोंढे, सुरेंद्रकुमार, एस. व्ही. स्वामी हेही व्यासपीठावर होते.

ते म्हणाले, की नव्या धोरणात प्रवेशात वयाची पुनर्रचना करण्यात आली आहे. तसेच, पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार या नव्या रचनेत दुसरीपर्यंत प्राथमिक टप्पा, तिसरी ते पाचवी हा दुसरा टप्पा, तर सहावी ते आठवी तिसरा आणि नववी ते बारावी हा चौथा टप्पा आहे.

यात विद्यार्थ्याच्या प्रगतीच्या मूल्यमापनासाठी (पीआयएमएम)शी लिंक केलेल्या वेब ॲप्लिकेशनद्वारे रेकॉर्डिंग करून सतत निरीक्षण केले जाते. यात १.२ लाख विद्यार्थ्यांचा डेटा संकलित असून, यंदापासून मूल्यांकनाचे शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रायोगिक तत्त्वावर बालवाटिका परिचय उपक्रमात ४९ केंद्रीय विद्यालयांत पाच हजार ४७७ विद्यार्थी जोडले जातील. त्यात तीन महिन्यांचे विद्यार्थ्यांच्या खेळाचे मॉड्युल विकसित करण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आटिफिशियल इंटेलिजन्स

आठवीपासून व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश करताना कौशल्य विकसित करण्यासाठी आर्टीफिशियल इंटेलिजन्सपासून तर सुतारकाम, कुंभारकाम यांसारख्या पारंपरिक अभ्यासाचा समावेश आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या पीएम केव्हीवायांतीन अंतर्गत देशातील २२८ केंद्रीय विद्यालयांत प्रायोगिक तत्त्वावर शाळाबाह्य, शिक्षणबाह्य कौशल्य केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

याशिवाय विद्यांजल पोर्टल, पीएम ई विद्या, दिक्षा (डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग) या डिजिटल व्यासपीठ, अभ्यासाचे रेडिओ स्टेशन, पॉडकास्ट, मोबाईल ॲप्लिकेशन, ३४० अटल टिंकरिग लॅब, २३८ केंद्रीय विद्यालयांत दोन हजार ३१० ई लर्निंग सोल्युशन्स अशा विविध उपक्रमांची श्री. ओलावत यांनी माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT