सिन्नर : सिन्नर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या खाजगी संगणक चालकास एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
तक्रार दाराकडून रेशन सुरू करून देण्याच्या बदल्यात त्याने ही रक्कम स्वीकारली. (Private computer driver in Sinner Tehsil caught by ACB 1 thousand Bribe accepted to start ration Nashik Crime)
शरद रुंजा आढाव (वय 40 ) हा सिन्नर तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेत खाजगी संगणक चालक म्हणून काम करतो. तक्रारदाराने पुरवठा विभागात त्याचे शिधापत्रिकेवर रेशन सुरू व्हावे म्हणून अर्ज दिला होता.
त्या अर्जाच्या अनुषंगाने रेशन सुरू करून देण्याच्या मोबदल्यात आढाव याने एक हजार रुपये ची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
या तक्रारीची खातरजमा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिन्नर तहसील कार्यालयात सापळा रचला होता. पंचांच्या समक्ष तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना आढाव यास रंगेहात पकडण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, हवालदार प्रफुल्ल माळी, विलास निकम यांच्या पथकाने ही कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.