सिडको (नाशिक ) : शहरात झाकीर हुसेन रुग्णालयात झालेली दुर्घटना ताजी असतानाच ऑक्सिजन अभावी शहरातील दोन ते तीन खासगी कोविड रुग्णालय बंद करावे लागू शकतात. यामुळे वाढत्या रुग्णसंख्येत असा निर्णय शहरासाठी चिंताजनक बाब आहे.
प्रशासनाने वेळीच योग्य ती भूमिका घ्यावी
काही दिवसांपासून सिडकोतील खासगी हॉस्पिटलला ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. वारंवार मागणी करूनही ऑक्सिजन सिलिंडर मिळण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. बुधवारी (ता.२१) ऑक्सिजनचा पुरवठा होऊ न शकल्याने सिडकोतील अनेक रुग्णांना इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा सल्ला देण्यात आला. पुढील दोन दिवसात ऑक्सिजन न मिळाल्यास नाइलाजास्तव सिडकोतील काही खासगी रुग्णालय असलेले कोविड सेंटर नाइलाजास्तव बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, अशी परिस्थिती सध्या तरी निर्माण झाली आहे. याकरिता प्रशासनाने वेळीच योग्य ती भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा डॉक्टर वर्ग व्यक्त करीत असल्याचे मत डॉ. वैभव महाले यांनी व्यक्त केले.
काही दिवसांपासून ऑक्सिजन पुरवठा विस्कळित झालेला आहे. बुधवारी ऑक्सिजन अभावी आम्हाला रुग्णांना नाही म्हणून सांगावे लागले. ते रुग्ण इतर ठिकाणी हलवण्याचा सल्ला नातेवाइकांना दिला. पुढील दोन दिवसात परिस्थिती न निवळल्यास नाइलाजास्तव कोविड सेंटर बंद करावे लागेल.डॉ. वैभव महाले, संचालक, कल्पतरू हॉस्पिटल
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.