NMC News : घर व पाणीपट्टीची देयके मालमत्ताधारकांपर्यंत वेळेत पोचत नसल्याने महापालिकेच्या महसुलावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे लक्षात आल्यानंतर देयके वाटपाचे खाजगीकरण करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती गठित करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी घेतला असून, दहा दिवसात अहवाल सादर करण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. (Privatization of housing water bill payment allocation Committee headed by Additional Commissioner nmc nashik)
महापालिकेला घरपट्टीच्या माध्यमातून उत्पन्न प्राप्त होते. परंतु त्यासाठी मालमत्ताधारकांच्या हातात वेळेवर देयके पडणे आवश्यक आहे. मात्र वेळेत देयके हातात पडत नसल्याने नागरिकदेखील मालमत्ता कर भरण्यात अडखळतात.
तीच परिस्थिती पाण्याच्या संदर्भातदेखील आहे. घरपट्टी व पाणीपट्टीची देयके देण्यासाठी महापालिकेकडे ८० कर्मचारी आहेत. परंतु त्यांना अतिरिक्त कामे दिली जात असल्याने प्रत्येक मालमत्तेधारकापर्यंत पोचू शकत नाही.
एकीकडे कर्मचारी कमी होत असताना दुसरीकडे मालमत्तांमध्येदेखील वाढ होत आहे. सद्यःस्थितीत पाच लाख ३७ हजार ८५१ मिळकतींची नोंद आहे, तर दोन लाख सहा हजार ८७ नळजोडणी आहेत.
मिळकतीच्या संख्येत दरवर्षी होणाऱ्या वाढीचे प्रमाण हे जवळपास २० ते २५ टक्के आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी, वाढणाऱ्या मिळकती तसेच आता केंद्र व राज्य शासनाने पंधराव्या वित्त आयोगाचा निधी हवा असल्यास घरपट्टी व पाणीपट्टीचे शंभर टक्के वसुली करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नागरिकांच्या हातात घर व पाणीपट्टीची देयके पडण्यासाठी खासगीकरणातून देयकेवाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या दप्तरी नोंद असलेल्या मिळकतींचा पूर्ण पत्ता, मिळकत धारकांचा भ्रमणध्वनी, ई- मेल, विद्युत देयक ग्राहक क्रमांकाची नोंद संगणकावर करणे, एप्रिल महिन्यात घरपट्टीच्या देयके वाटप करणे, वार्षिक मागणीची छपाई, नळजोडणी धारकांचे सर्वेक्षण करणे, मालमत्ता कराचा इंडेक्स क्रमांक तयार करणे, नळजोडणी शोधमोहीम राबविण्याबरोबरच नोटीस बजावण्याची जबाबदारी ठेकेदारावर राहणार आहे.
समिती देणार अहवाल
देयके वाटपाचे खाजगीकरण करण्यापूर्वी समिती निवृत्त करण्यात आली आहे. यामध्ये अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी हे समितीचे अध्यक्ष आहेत, तर कर विभागाचे उपायुक्त श्रीकांत पवार समितीचे सदस्य सचिव आहे.
पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, मुख्य वित्त व लेखा अधिकारी नरेंद्र महाजन, प्रभारी मुख्य लेखापरीक्षक प्रतिभा मोरे, कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर हे समितीचे सदस्य आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.