''कोरोना काळात चांगला अभ्यास केला. मात्र, यशाने मुलाखतीपर्यंत नेत अल्पशा फरकाने अपयश आले. नाउमेद न होता पुन्हा अभ्यासाला सुरवात केली. जिद्दीने अभ्यास सुरु ठेवला.''
खामखेडा : एकीकडे सरकारी नोकरी मिळत नसल्याची ओरड तरुणांमध्ये नेहमीच ऐकायला मिळत असताना खामखेडा येथील प्रियंका अविनाश शेवाळे (Priyanka Avinash Shewale) हिने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एकाचवेळी सरकारी नोकरीच्या (Government Job) चार परीक्षा उत्तीर्ण होत घवघवीत यश मिळवलं आहे.
खामखेडा येथील व सध्या जातेगाव (ता. नांदगाव) येथील मविप्र संस्थेच्या विद्यालयातील शिक्षक अविनाश शिवाजी शेवाळे यांची कन्या प्रियंकाने कुठलाही खासगी क्लास न लावता जिद्द व मेहनतीने घरीच अभ्यास करून महाराष्ट्र शासनाच्या सरळ सेवा अंतर्गत इतर मागास गटातून पहिली रँक प्राप्त करून नंदुरबार जिल्हा परिषद येथे कनिष्ठ सहाय्यक (लेखा) या पदावर निवड झाली.
या आधी तिची संभाजीनगर येथे जलसंपदा विभागात (Department of Water Resources) कालवा निरीक्षक, नाशिक येथे कृषी सहाय्यक व जलसंपदा विभागात स्टोअरकीपर या तीन पदांवर निवड झाली आहे. प्रियंका नंदुरबार जिल्हा परिषद येथे कनिष्ठ सहाय्यक (लेखा) या पदावर रुजू होणार आहे. प्रियांकाचे प्राथमिक शिक्षण नांदगावात व माध्यमिक शिक्षण नांदगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथे झाले आहे.
१२ वी नंतर अनेक पर्याय समोर होते. मात्र, स्पर्धा परीक्षा हेच उद्दिष्ट ठेवत तिने बी. एस्सी अॅग्रीला प्राधान्य दिले. कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी व त्यानंतर पुण्यातील शिवाजीनगर कृषी महाविद्यालयातून एम.एस्सी अॅग्री पूर्ण केली. या महाविद्यालयात उत्कृष्ट कामकाज व प्रगती या मुळे तिला महाविद्यालयाकडून स्टुडंट ऑफ द इअर पुरस्काराने गौरविण्यात आले. 'शिवचरित्र'वरील वक्तृत्व हा छंद जोपासत तिने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरु ठेवला.
कोरोना काळात चांगला अभ्यास केला. मात्र, यशाने मुलाखतीपर्यंत नेत अल्पशा फरकाने अपयश आले. नाउमेद न होता पुन्हा अभ्यासाला सुरवात केली. जिद्दीने अभ्यास सुरु ठेवला. त्यामुळे नुकत्याच झालेल्या या चार पदांवर तिची निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल आजी-माजी सरपंच शकुंतला शेवाळे, काका सुनिल शेवाळे, अशोक शेवाळे यांसह सर्वांनी कौतुक केलं आहे.
मला मिळालेल्या यशाचे श्रेय माझ्या मार्गदर्शकांना व माझ्या परिवाराला जाते. माझ्या सारख्या परीक्षार्थींना मी एकच संदेश देऊ इच्छिते की, "यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे.
प्रियंका शेवाळे, खामखेडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.