UPSC Exam esakal
नाशिक

UPSC 2023 परीक्षेचे संभाव्‍य वेळापत्रक जाहीर

अरूण मलाणी

नाशिक : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) पुढील वर्षी २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्‍पर्धा परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक जारी झाले आहे. पूर्वपरीक्षा (Pre), मुख्य परीक्षेसह (Mains) अन्‍य विविध स्‍वरूपाच्‍या परीक्षांचा समावेश या वेळापत्रकात केलेला आहे. दरम्‍यान, वेळापत्रकानुसार नागरी सेवा (पूर्व) परीक्षा २०२३ पुढील वर्षी मेमध्ये घेतली जाणार आहे. (Probable schedule of UPSC 2023 exam announced Nashik education News)

कोरोनाची परिस्‍थिती पूर्वपदावर आलेली असताना आता निर्धारित वेळापत्रकानुसार (Timetable) परीक्षा होऊ लागल्‍या आहेत. उमेदवारांना वेळेचे व्‍यवस्‍थापन व नियोजन उचित प्रकारे करता यावे, या उद्देशाने आयोगामार्फत २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकात विविध पूर्वपरीक्षांसमवेत यातून पात्रता मिळविणाऱ्या उमेदवारांच्‍या मुख्य परीक्षा घेण्याबाबत नियोजन आखण्यात आलेले आहे. किमान एक ते कमाल दहा दिवसांपर्यंतच्‍या परीक्षेचे नियोजन यूपीएससीमार्फत केले जाणार आहे. काही अपरिहार्य कारणास्‍तव बदल करावे लागले, तर राखीव तारखांचे प्रयोजनदेखील केलेले आहे.

अन्‍य संस्‍थांना होणार मदत

संभाव्‍य वेळापत्रक जाहीर झाल्‍याने उमेदवारांची सोय होणार आहे. सोबत राज्‍यस्‍तरावर भरती प्रक्रियेसाठी कार्यरत असलेल्‍या एमपीएससी (MPSC) व यांसारख्या अन्‍य संस्‍थांनादेखील आपले वेळापत्रक ठरविताना मदत होणार आहे. अनेकदा परीक्षांच्‍या तारखा एकच आल्यास उमेदवारांची द्विधा मनःस्‍थिती होते, अशा परिस्‍थितीत गैरसोय टाळत अन्‍य संस्‍थांनाही नियोजन करणे सोपे झालेले आहे.

संभाव्‍य वेळापत्रक

परीक्षेचे नाव परीक्षेची संभाव्‍य तारीख

अभियांत्रिकी सेवा (पूर्व) परीक्षा १९ फेब्रुवारी

संयुक्‍त जीओ-सायंटिस्‍ट (पूर्व) परीक्षा १९ फेब्रुवारी

सीबीआय (डीएसपी) एलडीसीई ११ मार्च

सीआयएसएफ एसी (ईएक्‍सई) एलडीसीई १२ मार्च

एनडीए अॅन्ड एनए\सीडीएस एक्‍झामिनेशन-एक १६ एप्रिल

नागरी सेवा (पूर्व) परीक्षा २८ मे

भारतीय वनसेवा (पूर्व) परीक्षा २८ मे

संयुक्‍त जीओ सायंटिस्‍ट (मुख्य) परीक्षा २४ जून

अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा २५ जून

संयुक्‍त वैद्यकीय सेवा परीक्षा १६ जुलै

एनडीए ॲन्ड एनए, सीडीएस परीक्षा-२ ३ सप्‍टेंबर

नागरी सेवा (मुख्य) परीक्षा १५ सप्‍टेंबर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT