Vishal Narwade, assistant collector of Kalwan, while knowing the problems of the tribal brothers at dhodap fort esakal
नाशिक

Nashik News : आदिवासी बांधवांच्या समस्या सुटणार; सूचनेनंतर यंत्रणा नागरीकांच्या दारात

सकाळ वृत्तसेवा

कळवण (जि. नाशिक) : कळवण आदिवासी तालुक्यातील धोडप किल्ल्यावर पिढ्यान्‌पिढ्या वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांची शासकीय यंत्रणेने भेट घेऊन समस्या आणि उपाययोजनांबाबत माहिती घेऊन निर्माण झालेल्या समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिल्यामुळे १५ कुटुंबे सुखावली आहे. (problems of tribal brothers will solved After notification system at door of citizens Nashik Latest Marathi News

कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांच्या सुचनेनुसार ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर देशमुख, डॉ. गुंजाळ, विस्तार अधिकारी टोकरे, ग्रामसेविका वैशाली देवरे, आरोग्यसेवक दिनेश शेवाळे, आरोग्यसेविका जयश्री निकम, शितल आहेर, माधुरी देवरे, तुषार भुजाडे यांच्या पथकाने भेट देऊन नागरिकांची तपासणी करीत आजारी रुग्णांवर औषधोपचार केले. नागरिकांना लसीकरणाबाबत विचारणा केली असता आरोग्यसेवक दिनेश शेवाळे यांनी लसीकरण केल्याचे नागरिकांनी सांगितले. आरोग्यविषयक समस्यांबाबत गैरसमज दूर करीत प्राथमिक उपचारासंदर्भात माहिती देत औषधे उपलब्ध करुन दिली.

अंगणवाडीमध्ये गरोदर माता, स्तनदा माता व इतर लाभार्थींची तपासणी करण्यात आली. ग्रामपंचायत मेहदरअंतर्गत असलेल्या या भागात शिवकालीन पाण्याचे कुंड असून, पिण्याच्या पाण्याची रासायनिक व जैविक तपासणी करून ग्रामपंचायतीमार्फत दिलेल्या मेडीक्लोरचा पाण्यात नियमित वापर करण्याबाबतच्या सूचना ग्रामसेविका वैशाली देवरे यांनी दिल्या. ग्रामपंचायतअंतर्गत प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. या वेळी वापरात न येणाऱ्या शिवकालीन कुंडामध्ये गप्पी मासे सोडण्यात आली.

हेही वाचा : Credit Score :असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

६० कुटुंबांना मिळाला दिलासा

कळवण तालुक्यातील माची धोडप किल्ल्यावरील अलंगवाडी, सोनारवाडी, गोळवाडी अशा तीन वाड्यांमिळून जवळपास ६० कुटुंबे वास्तव्यास आहेत. म्हशी व गायी पालन करून दुग्ध व्यवसायावर उदरनिर्वाह पिढ्यान्‌पिढ्या करतात. मात्र, हा व्यवसाय करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी, त्यांची आर्थिक प्रगती खुंटली आहे. सदर वाड्या मेहदर ग्रामपंचायतअंतर्गत येत असल्याने परिसरातील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी शासकीय यंत्रणा आदिवासी बांधवांच्या दारापर्यंत पोहचल्यामुळे या कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

स्वच्छ भारत अभियान होईल यशस्वी

माची धोडप येथील वस्त्यांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव आहे. पायथ्य पासून वस्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अडीच ते तीन किलोमीटर पक्क्या रस्त्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत तेथे विकास अशक्य आहे. वाड्यांमध्ये स्वच्छतागृहे उभारल्यास खऱ्या अर्थाने मेहदर ग्रामपंचायत १०० टक्के हगणदारीमुक्त होऊन स्वच्छ भारत अभियान यशस्वी होईल, असा विश्‍वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT