Farmer girls of Karmaveer Kakasaheb Vagh Krishi Vidyalaya visiting Biofloc Fish Farming Project. esakal
नाशिक

मत्स्यपालनामधून तरुणांकडून लाखोंचे उत्पादन; बायोफ्लॉक फिश फार्मिंग प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नोकरीच्या मागे न धावता निफाड तालुक्यातील दोन तरूणांनी ‘बायोफ्लॉक फिश फार्मिंग प्रकल्प उभारत मत्स्यपालनामधून लाखोंचे उत्पादन घेत तरुणांना पैसे कमाविण्याचा मार्ग दाखवून दिला आहे.

उंबेरखेड (ता. निफाड) गावामधील २५ वर्षीय तरुण भूषण आथरे व सागर गोडसे यांनी आपल्या शेतात एक अनोखा प्रयोग केला आहे. ‘बायोफ्लॉक फिश फार्मिंग असे या प्रकल्पाचे नाव असून निफाड तालुक्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे. या तरुणांनी २०१८ मध्ये या प्रकल्पाची सुरवात केली. ज्यामध्ये फक्त ९ गुंठ्यात त्यांनी ३० हजार लिटर क्षमता असलेल्या पाच टाक्या बसविल्या आहेत. (Production of lakhs by youth from fisheries Biofloc Fish Farming Project Nashik latest marathi news)

ज्यामध्ये ‘तलंगिय’ प्रकारचे मत्स्य बीज टाकले जातात. एका टाकी मध्ये ४-५ हजार बीज सामावू शकतात. प्रोबायोटीक बॅकटेरिया व १५ किलो गुळाचे मिश्रण तयार करून प्रत्येक टाकीमध्ये सोडले जातात. जे या बिजातून तयार झालेल्या तिलापिया माश्‍याला खाद्य म्हणून उपयोगास येतात. खाल्ल्यानंतर माशांनी निर्माण केलेल्या विष्टेवरच हे बॅकटेरिया आपली संख्या वाढवितात.

म्हणजेच एकदा वापरल्यानंतर हे culture पुन्हा पुन्हा वापरण्याची गरजही भासत नाही आणि खर्चही कमी होतो. या प्रकल्पामधून या तरुणांनी केवळ सहा महिन्यांत फक्त दीड लाखाची गुंतवणूक करत ६-७ लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे.

त्याचबरोबर समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखत भूषण आणि सागर यांनी अनेक तरुणांसाठी निफाड बायॉफ्लोक फिश फर्मींग व ट्रेनिंग सेंटर या नावाने ट्रेनिंग सेंटर सुद्धा सुरू केले आहे. यामध्ये आतापर्यंत १५०-२०० तरुणांना मार्गदर्शन लाभले आहे. शेतीला जोडधंदा म्हणून हा बायोफ्लोक फिश फार्मिंग प्रकल्प नक्कीच फायदेशीर ठरू शकतो, हे या तरुणांनी पटवून दिलेले आहे.

कृषीकन्यांची भेट

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कर्मवीर काकासाहेब वाघ विद्यालयामार्फत राबवल्या गेलेल्या ग्रामीण कृषी, जागरूकता कार्यानुभव व कृषिकन्या प्रीती जावळे, प्रियांका जेधे, साक्षी जगताप, आदिती दारकुंडे, पूजा गोसावी, संस्कृती कडाळे, निकिता गवळी यांनी या प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेतली. या कार्यात त्यांना के. के. वाघ महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एम. हाडोळे, प्रा. पी. बी. पवार, प्रा. व्ही. पी. गुळवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

‘बायोफ्लॉक फिश फार्मिंग म्हणजे नेमकं काय ?

बायोफ्लॉक ही संकल्पना मुळात इस्राईलची असून या तरुणाने हा प्रयोग महाराष्ट्रामध्ये करून दाखवला आहे. या तत्रंज्ञाना मध्ये कोणत्याही प्रकारच्या रासायनिक घटकांचा वापर न करता मत्स्य पालन केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT