bride in parlour esakal
नाशिक

लग्नसराईत ब्युटी पार्लरला सुगीचे दिवस; दुकाने हाऊसफुल

संदीप पाटील

विराणे (जि. नाशिक) : सध्या लग्नसराई जोरदार चालू आहे. कोविड (Covid) सुरू झाल्यानंतर गेल्या दोन वर्षात साध्या पद्धतीने लग्न झालीत. अनेक ब्युटी पार्लरमध्ये (Beauty Parlour) लग्नासाठी वधू सजण्यास आल्याच नाहीत. परंतु, यंदा लग्न समारंभ पूर्वीप्रमाणेच बहुसंख्य लोकांत पार पडत आहेत. प्रत्येक वधू लग्नात सुंदर दिसाव म्हणून ब्युटी पार्लरमध्ये लग्नापूर्वी दोन ते तीनवेळा जात असते. लग्नाच्या दिवशी सुद्धा ब्युटी पार्लरमधूनच वधू नटुन- थटून थेट मंडपात येते. वधूसोबत जवळच्या नात्यातील मुली, महिलादेखील ब्युटी पार्लरमध्येच सजतात. म्हणून यंदा ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलांना सुगीचे दिवस आले असून, पार्लर हाऊसफुल (Housefull) झाली आहेत. (Profitable days for beauty parlour during this wedding season Nashik Wedding News)

वधूच्या मेकअपचे पाच ते पंचवीस, तीस हजार रूपये घेतले जातात. जसा साज तसा पैसा घेतला जातो. प्रत्येक कुटुंब आपल्या मुलीच्या हौसेसाठी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार पार्लरचा खर्च करत असतात. वधूसोबतच आई, बहिण, मावशी, आत्या तसेच मैत्रीणी व जवळच्या नात्यातील मुली, महिला सजण्यास पार्लरचा आधार घेतात. यातील बहुतांश नातलगांचा खर्च वधूपिताच करतो. लग्न एकदाच होते म्हणून वधूपिता देखील खर्चास तयार होतात. कुणीही लग्नात नाराज नको हाच उद्देश या खर्चामागे असतो. सध्या ब्युटी पार्लरमध्ये गर्दीचा ओघ सुरू असल्याने ब्युटी पार्लरला सुगीचे दिवस आले आहेत.

"नैसर्गिक सौंदर्य हिच आपली देणगी आहे. उगीच लग्नात सौंदर्य खुलावे म्हणून ब्युटी पार्लरचा आधार घेणाऱ्यांचा गोड गैरसमज आहे. यामुळे वारेमाप खर्च होतो."

- नयना पगार, मालेगाव

"वधू व जवळच्या नात्यातील मुली, महिलांच्या आग्रहाखातर व लाड पुरविण्यासाठी ब्युटी पार्लरचा खर्च करावाच लागतो. शेवटी वधू संपूर्ण लग्नकार्यात आनंदात असावी, हाच उद्देश असतो."

- नंदू सोंजे, मालेगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT