Nashik Police Commissionerate esakal
नाशिक

Nashik News: आयुक्तालय हद्दीत शहरात 26 ऑक्टोबरपर्यंत मनाई आदेश

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी १२ ते २६ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार शहर आयुक्तालय हद्दीमध्ये मनाई आदेश लागू केले आहेत.

राज्यातील विविध राजकीय पक्षांमधील फूट व त्यामुळे होणारे आरोप-प्रत्यारोप, त्याचप्रमाणे, सामाजिक, राजकीय वेगवेगळ्या प्रकरणे, महापुरुषांविषयी वादग्रस्त विधाने, त्यासंदर्भात निदर्शने यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारत येत नाही. (Prohibitory order till October 26 in city under Commissionerate limits Nashik News)

तसेच, १५ ते २४ ऑक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सव असल्याने यानिमित्ताने शहरातील देवी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.

या पार्श्‍वभूमीवर शहरात शांतता कायम राहावी व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्‌भवू नये यासाठी शहर पोलिस आयुक्त शिंदे यांनी १५ दिवसांसाठी शहरात मनाई आदेश लागू केले आहेत.

त्यानुसार नागरिकांना कोणतेही दाहक किंवा स्फोटक पदार्थ सोबत नेता येणार नाही. दगड, शस्त्र, लाठ्या, बंदुका बाळगता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीचे प्रतिकात्मक प्रेतांचे किंवा प्रतिमेचे प्रदर्शन किंवा दहन करता येणार नाही.

आरडाओरड, वाद्य वाजवण्यास बंदी असेल. प्रक्षोभक भाषण, वर्तवणुकीस बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी महाआरती करणे, वाहनांवर झेंडे लावून फिरणे, पेढे वाटणे, फटाके फोडणे, घंटानाद करणे, शेरेबाजी करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

पूर्वपरवानगीशिवाय पाच किंवा पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र जमण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशांचे उल्लंघन करणारे महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ चे कलम १३५ नुसार शिक्षेस पात्र राहतील असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT