nmc property tax latest marathi news esakal
नाशिक

Nashik News : घरपट्टी वसुली दीडशे कोटींच्या पुढे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : उत्पन्नात वाढ करण्यासाठी महापालिका प्रशासनाने अमलात आणलेल्या उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून महापालिकेच्या इतिहासातील घरपट्टीतील सर्वाधिक दीडशे कोटी रुपयांच्या वर वसुली झाली आहे.

मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ३१ कोटी रुपयांनी महसुल वाढला आहे. (property tax collection over 150 crores Nashik News)

घरपट्टीची थकबाकी साडेतीनशे तर पाणी पट्टीची थकबाकी दीडशे कोटी रुपये झाली होती. आर्थिक वर्षाच्या सुरवातीला राबविलेली अभय योजना व सवलत योजनेमुळे ४२ कोटी रुपये महसुल प्राप्त झाला.

त्यानंतर एक हजार २३८ मोठ्या थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या. त्याचबरोबर घरासमोर ढोल बजाओ मोहीम राबविण्यात आली. यातून १५ कोटी रुपयांचा महसुल मिळाला. त्यानंतर ७६ हजार थकबाकीदारांना सूचना पत्रे पाठवत मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू करण्यात आल्याने त्यातून वसुलीचा आकडा वाढला.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

सोमवारी (ता. १३) दीडशे कोटी सहा लाख रुपये वसुल झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. एकूण वसुलीत ५९ कोटी ९८ लाख रुपये थकबाकी तर ८९ कोटी ११ लाख रुपये सद्य:स्थितीतील करवसुलीतून प्राप्त झाले.

९६ लाख रुपयांची आगाऊ घरपट्टी जमा झाली. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा घरपट्टीत ३०.८२ कोटी रुपयांनी वाढ झाली. दरम्यान पाणीपट्टी वसुलीत मात्र अपेक्षित यश मिळत नसल्याचे दिसत आहे. ७५ कोटी रुपयांपैकी अवघे ४६.९८ कोटी रुपये वसुल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Latest Maharashtra News Updates : थंडीत घट..! नाशिकचे किमान तापमान पोहोचले 17.7 अंशांवर

ऋषभ पंतसारखाच आणखी एका क्रिकेटपटूचा भीषण अपघात; गाडीचा झालाय चुराडा...

भावासाठी उदयनराजे मैदानात! 'झुकेगा नही साला' म्हणत, कॉलर उडवत शिवेंद्रराजेंना मताधिक्‍याने विजयी करण्याचं केलं आवाहन

Nawab Malik : मतदानाच्या एक दिवस आधीच नवाब मलिक यांचे 'एक्स' अकाऊंट हॅक

SCROLL FOR NEXT