नाशिक : शहरात मसाज सेंटरच्या नावाखाली राजरोस देहविक्री सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शाखेने उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जयभवानी रोडवरील एका एका मसाज सेंटरवर टाकलेल्या छाप्यात दोघांना बेड्या ठोकत पोलिसांनी तीन परप्रांतीय महिलांची सुटका केली. (Prostitution under name of massage parlour 3 Migrant Women saved Nashik Crime New)
संशयित आर्थिक फायद्यासाठी पीडितांकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. सुभाष केदारे व सागर माने, असे अटक केलेल्या मसाज सेंटरच्या मालकांची नावे आहेत. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या सूचनेनुसार काही दिवसांपासून अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिस सक्रिय आहेत.
अनेक ठिकाणी छापेमारी सुरू झाली आहे. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे कर्मचारी संदीप पवार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
जयभवानी रोड भागातील टीव्हीएस शोरूम समोर असलेल्या प्रियदर्शिनी व्हिला गेस्ट रूममध्ये देहविक्री होत असल्याची माहिती पोलिसांना गुरुवारी (ता. १२) मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक डॉ. आँचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी छापा टाकला असता, देहविक्रीचा भांडाफोड झाला.
या कारवाईत सुभाष केदारे आणि सागर माने दोघा सेंटर मालकांना बेड्या ठोकत उत्तर प्रदेश आणि आसाम येथील तीन महिलांची सुटका केली. संशयितांना उपनगर पोलिसांच्या स्वाधीन केले असून, याप्रकरणी बळजबरीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी व अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यवर्ती शाखेचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. मुदगल, सहाय्यक निरीक्षक धर्मराज बांगर, उपनिरीक्षक माणिक गायकर, नितीन फुलपगार, अभिजित पवार, दत्तात्रेय कडनोर, शंकर गोसावी, सुनील भालेराव, दिलीप ढुमणे, श्रीराम सपकाळ, शेरखान पठाण, किशोर देसले, बाळू बागूल, संजय गामणे, समीर चंद्रमोरे, दीपक पाटील, गणेश वाघ, संदीप पवार, सरिता सातपुते, प्रीती कातकाडे, नीलिमा निकम, युवराज कानमहाले, अतुल पाटील, प्रजित ठाकूर, वैशाली घरटे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
गांजा विक्री तेजीत
उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मसाज पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या अवैध धंद्यावर कारवाया सुरू झाल्या असल्या तरी, गांजा विक्रीचे धंदे मात्र सर्रास सुरू आहे. कॅनॉल रोड झोपडपट्टीपासून तर लोखंडे मळा भागातील महापालिकेच्या उद्यानात राजरोसपणे चालणाऱ्या फिरते गांजा विक्रेते शोधण्यात मात्र पोलिसांना यश आलेले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.