Manikrao Shinde, officials and workers participated in the protest in front of the Tehsil office in protest of Bhujbal's statement. esakal
नाशिक

Nashik News: काळे झेंडे, काळ्याफिती लावून भुजबळांच्या व्यक्तव्याचा निषेध!

येवला कुणाचा नसून पवार यांचाच बालेकिल्ला : माणिकराव शिंदे

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : एका बाजूला शरद पवार यांना विठ्ठल म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूने दुखवायचे, हे दुर्दैवी आहे, असे स्पष्ट करत येवला कुणाचा बालेकिल्ला नसून, पवार यांचा बालेकिल्ला आहे, हे अनेकदा दिसले व पुन्हा दिसेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ॲड. माणिकराव शिंदे यांनी केले.

बीड येथील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेतील मंत्री छगन भुजबळांच्या भाषणाचे पडसाद सोमवारी (ता. २८) त्यांच्या होमपिचवर उमटले.

भुजबळ यांचा बालेकिल्ला असणाऱ्या मतदारसंघातच भुजबळांविरुद्ध काळे झेंडे व काळ्या फिती लावून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. (Protest against Bhujbal by wearing black flags black ribbons Nashik NCP News)

बीडमध्ये अजित पवार गटाच्या झालेल्या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांविरुद्ध वक्तव्य केले. त्याविरोधात येवल्यात शरद पवार गटाकडून ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

सोशल मीडियावरून आवाहन करताच अवघ्या दोन तासांत शेकडो कार्यकर्ते शिंदेंच्या रायगड बंगल्यावर जमा झाले.

तेथून हातात काळे झेंडे व काळ्या फिती लावून भुजबळांचा निषेधाच्या घोषणा दिल्या. ‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार... शरद पवार’, अशा घोषणा देत दुचाकी रॅली काढत सर्व कार्यकर्ते तहसील कार्यालयावर आले.

तहसील कार्यालयाचा परिसर घोषणांनी दणाणून सोडला. तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. शाहू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. या आंदोलनात प्रत्येकाने ‘मी शरद पवार समर्थक’ यासह स्लोगन लिहिलेली टोपी घातली होती.

शिंदे म्हणाले, की सातत्याने पवार यांच्याविरोधात बोलले जात असून, बीड येथील वक्तव्य महाराष्ट्रातील जनतेला अजिबात आवडलेले नाही. सभेत झालेला विरोध पवार यांच्यावरील प्रेम आहे, असे सांगत २० वर्षांपूर्वी तुमची अवस्था व संक्रमण काळ मी जवळून बघितला आहे.

त्या वेळी काय काय झाले? काय काय चालले होते, हे सगळे मला माहीत आहे. त्यामुळे पवार यांनी वारंवार मंत्रिपदे दिली. त्यांच्याविरोधात बोलणे अतिशय दुर्दैवी आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

एकीकडे विठ्ठल विठ्ठल म्हणून बोलायचे आणि दुसरीकडे दुखवायचे, हे बरोबर नसून हा प्रकार निषेधार्थ आहे. शरद पवार यांच्यामुळे त्या वेळी भुजबळ यांना येवल्यातील शरद पवारप्रेमी जनतेने राजकीय पुनर्जन्म दिला आहे, हे विसरून चालणार नाही.

अवघ्या दोन तासांत जमलेली गर्दी म्हणजे मतदारसंघ केवळ पवारांचाच आहे हे विसरू नये, असा इशाराही त्यांनी दिला. मतदारसंघातून मंगळवारी (ता. २९) शरद पवार गटाचे कार्यकर्ते मुंबईला शरद पवारांच्या भेटीसाठी जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

आंदोलनात माजी सभापती विठ्ठल शेलार, तालुकाध्यक्ष कलिदी पाटील, बाजार समितीच्या माजी सभापती उषाताई शिंदे, कल्पना शिंदे, अजीज शेख, माजी नगरसेवक रिजवान शेख, माजी सरपंच रामदास पवार,

राजेश कदम, सुरेश कदम, प्रताप पाचपुते, झुंझार देशमुख, मधुकर देशमुख, रमेश शिंदे, अरविंद शिंदे, ॲड. शाहू शिंदे, सुभाष निकम, मजीद अन्सारी, साईनाथ मढवई, राजेंद्र हिरे, नारायण मोरे, सचिन कड, योगेश सोनवणे,

नंदू दाने, काका वाणी, नाना गायकवाड, दीपक लाठे, सद्दाम शेख, अन्सार शेख, सुदाम सोनवणे, नारायण गायकवाड, फिरोज शेख, प्रमोद लभडे, बाळासाहेब खोडके, अनिल शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT