Grandmothers and ex-soldiers taking out a march to protest the attack on a soldier and giving a statement to the administration. esakal
नाशिक

Nashik News: सैनिकावरील हल्ल्याच्या विरोधात येवल्यात निषेध मोर्चा; संबंधितांवर कारवाईची मागणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : ठाणगाव पिंपरी येथे कर्तव्यावर असलेले सैनिक मच्छिंद्र शेळके यांना व त्यांच्या कुटुंबीयांना दहा ते बारा जणांकडून मारहाण करत शिवीगाळ करण्यात आली आहे.

याप्रकरणी रक्षक माजी संघटना आक्रमक झाली असून आज येथील तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येऊन कारवाईची मागणी केली आहे. (Protest march against attack on soldier Demand action against concerned Nashik News)

श्री. शेळके हे सुट्टीसाठी गावी आले असता काहीतरी कुरापत काढून त्यांच्या कुटुंबास परिसरातील काही गावगुंडांनी मारहाण केली. त्याची तक्रार देण्यासाठी तालुका पोलिस ठाण्यात शेळके आले होते.

त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र सांगितल्याने वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी शेळके ग्रामीण रुग्णालयात गेल्यानंतर दहा ते बारा जणांनी जवानाला तेथेही मारहाण केली. या मारहाणीमध्ये शेळके हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या घटनेनंतर आजी-माजी सर्व सैनिक व रक्षक संघटना चांगलीच आक्रमक झाली असून या गावगुंडांना तत्काळ धडा शिकून अटक करावी या मागणीसाठी तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.

याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार आबा महाजन यांना देण्यात आले. तहसीलदार महाजन यांनी माहिती घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले जातील अशी माहिती दिली. याप्रसंगी शेकडोंच्या संख्येने शहरातील व तालुक्यातील आजी- माजी सैनिक तसेच युवक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT