Devidas Pingale interacting with Deputy Chief Minister Ajitdada Pawar on district bank issue. esakal
नाशिक

NDCC Bank: जिल्हा बँक पुनर्जीवित करण्यासाठी अर्थसहाय्य करा : सभापती देवीदास पिंगळे

सकाळ वृत्तसेवा

NDCC Bank : डबघाईस आलेली नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकबाबत माजी खासदार तथा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे यांनी बुधवारी (ता. १२) उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली.

जिल्हा बँक पुनर्जीवित करण्यासाठी दोन हजार कोटी रुपये कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य करा, अशी मागणी पिंगळे यांनी केली आहे. त्यामुळे नाशिककरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (Provide funding to revive NDCC district bank Chairman Devidas Pingle statement to ajit pawar nashik)

बँकेला ६८ वर्षांची परंपरा असून, ही बँक महाराष्ट्रातील नावाजलेल्या बँकांमध्ये गणली जात होती. जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थकारणात जिल्ह्यातील सहकारी संस्थाची मातृसंस्था म्हणून बँकेने कामकाज केले आहे.

प्राथमिक, विविध कार्यकारी, दुग्ध संस्था, खरेदी-विक्री संघ, नागरी बँका, नागरी पतसंस्था, सहकारी साखर कारखाने अशा अनेक सहकारी संस्था उभारणीत मोलाचा वाटा आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सभासद, शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या शेती व शेतीपूरक कामासाठी या बँकेने अर्थसहाय्य देऊन मोठे योगदान दिले आहे.

जिल्हा बँकेचा कर्ज वसुलीअभावी एनपीए वाढल्याचा अहवाल ‘नाबार्ड’ने २०१६ मध्येच दिला आहे. ३० फेब्रुवारी २०१७ ला जिल्हा बँकेवर बरखास्तीची कारवाईची वेळ आली होती.

नाशिक जिल्ह्याची अर्थवाहिनी समजली जाणारी बँक वाचविण्यासाठी माजी खासदार तथा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांनी बुधवार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली.

जिल्हा मध्यवर्ती बँकेची आजची परिस्थिती सांगत दोन हजार कोटी रुपयांचे शासनाकडून कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य देण्याची मागणी पर निवेदन दिले. या वेळी त्यांच्या समवेत बाजार समिती माजी संचालक दिलीप थेटे, तुकाराम पेखळे, विश्वास नागरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

भुजबळांचेही मिळणार बळ

माजी खासदार तथा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थितीबाबत माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती.

यात भुजबळ यांनी देखील जिल्हा मध्यवर्ती बँक वाचविण्यासाठी पाठपुरावा करणार असून, शासनाकडून अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

एकंदरीतच या प्रश्नास भुजबळांचे बळ मिळाल्यास जिल्हा मध्यवर्ती बँकेचा प्रश्न मार्गी लागणार, अशी अशा नाशिककरांच्या पल्लवित झाल्या आहेत.

"आजची परिस्थिती बघता शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. त्यास लागलीच कर्ज उपलब्ध होत नाही. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तीन महिन्यांत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लायसन्स रद्द करेल. यामुळे नाशिक जिल्ह्यातील तमाम सभासद शेतकरी यांचे नुकसान होऊ शकते. तरी शासनाच्या माध्यमातून बँक वाचविणेकामी कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य करावे व नाशिककरांना न्याय द्यावा."

- देवीदास पिंगळे, माजी खासदार तथा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT