नाशिक : आयपीएल (IPL) क्रिकेटवर बेटिंग सुरू ठेवण्यासाठी तीन लाखांची लाच स्वीकारताना अटक केलेल्या पोलिस उपनिरीक्षकासह त्याच्या पंटरला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. संशयित महेश वामनराव शिंदे आणि संजय आझाद खराटे (रा. गंगानिवास, एमजी रोड, नाशिक रोड) अशी दोघांची नावे आहेत.
शिंदेविरोधात अनेक तक्रारी
महेश शिंदे पोलिस उपनिरीक्षक असून, २० दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. शहर पोलिस दलात कार्यरत असताना शिंदेविरोधात अशा अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. यातील एका प्रकरणात शिंदेला निलंबितही करण्यात आले होते. दरम्यान, नाशिकमधून बदली होऊन तो ग्रामीण पोलिस दलात हजर झाला. गणेशोत्सवाचा बंदोबस्त आटोपल्यानंतर शिंदे एलसीबीत हजर झाला. मात्र, शहरातच वास्तव्यास असलेल्या शिंदेचे उद्योग थांबले नाहीत. त्याने एका मध्यस्थी पंटरच्या मदतीने देवळाली कॅम्पला आयपीएल क्रिकेट बेटिंग सुरू ठेवण्यासाठी पंटरमार्फत चार लाखांची लाच मागितली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार तीन लाखांत व्यवहार ठरला असता, गुरुवारी (ता. ३०) त्याला लाच स्वीकारताना सापळा लावून पकडण्यात आले.
खासगी सावकरीचा उद्योग थाटला
उपनिरीक्षकासोबत पकडलेल्या त्यच्या पंटरची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू असून, त्याचा खासगी सावकरीचा उद्योग असल्याचे तपासात पुढे येत आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीकडे लक्ष लागून आहे.
यापूर्वीही वादग्रस्त
दरम्यान, संशयित उपनिरीक्षक महेश शिंदे यापूर्वीही अनेक प्रकरणांत वादग्रस्त आहे. सातपूरला खुनाच्या प्रकरणात त्याने माहिती दडविली म्हणून शहर पोलिसांनी यापूर्वी त्याच्यावर कारवाई केली आहे. तेथून बदलीनंतर मुंबई नाका आणि उपनगर पोलिस ठाण्यातही त्याच्या विरोधात तक्रारी होत्या. सातपूरला गंभीर गुन्ह्यातील माहिती दडवून ठेवून परस्पर संशयितांशी संर्पक साधून उखळ पांढरे करून घेण्याचे त्याच्यावर यापूर्वीही आरोप झाले आहेत. शहर पोलिसांच्या कारवाईनंतर आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकल्याने पोलिसातील गुन्हेगारीचा विषय यानिमित्ताने पुढे आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.