Rohit Jadhav with family esakal
नाशिक

PSI Success Story: MPSCच्या पहिल्या प्रयत्नात रोहितची पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी!

पुढे परीक्षा देऊन आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न...

सकाळ वृत्तसेवा

विकास गिते

PSI Success Story : वडीलांकडे अत्यल्प उत्पन्न त्यातून येणाऱ्या पैशातून घर, शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी होणारी आईवडिलांची धडपड हे सर्व बघवत नव्हते.

हि परिस्थिती बदलावयाची असेल तर आपल्याला अभ्यास करून मोठे व्हावे लागेल अशी जिद्द, चिकाटी अन कठोर मेहनत उराशी बाळगून सिन्नर शहरातील सिन्नर शिर्डी महामार्गावर असलेल्या खंडोबा मंदिरा जवळील अष्टविनायक नगर येथील नानासाहेब भगवान जाधव यांच्या हरहुन्नरी लेकाने एम पी एस सी विभागाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होत आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

त्याच्या या यशामुळे आईवडिलांचा उर भरून आला असून आयुष्य सार्थकी लागल्याचे ते मोठ्या भावनेने सांगत आहे. (PSI Success Story Rohit jadhav gets post of police sub inspector in MPSC first attempt Nashik)

सिन्नर शहरातील खंडोबा मंदिरा जवळील अष्टविनायक नगर येथे राहत असलेल्या नानासाहेब भगवान जाधव व संजोकता नानासाहेब जाधव हे

वास्तव्यास आहे. मुसळगाव येथील बोरा क्रिस कंपनीत केमिस्ट म्हणून नानासाहेब हे नोकरीला आहेत कमी अधिक उत्पन्नातून जाधव दांपत्य घर खर्च व मुलांचा शिक्षणाचा खर्च भागवीत असत. या परिस्थितीत आईवडिलांची होणारी घालमेल बघता त्यांचा मोठा मुलगा रोहित याने ही परिस्थिती बदलवण्याचा निश्चय खेळण्याबागडण्याच्या वयातच केला.

अंगी जिद्द, चिकाटी व कठोर मेहनत अन् हुशारीच्या जोरावर त्याने शालेय शिक्षण सिन्नर येथील स्वर्गीय नानासाहेब गडाख यांच्या ज्ञान संकुलात अर्थात एस जी पब्लिक स्कूल माध्यमिक विभाग येथे दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.

त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण व पदवी राजे छत्रपती संभाजी स्कूल धुळे तसेच महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे पूर्ण केले.

प्राथमिक ते पदवी पर्यंतच्या शैक्षणीक प्रवासात रोहित ने अनेक कष्ट व हालअपेष्टा सहन केल्या. मात्र तरी देखील न डगमगता स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिला. या काळात त्याच्यातील हरहुन्नरीपणा, जिद्द व चिकाटी बघून काही शिक्षकांनी व आई-वडिलांनी आवश्यक ते सर्व मार्गदर्शन केले.

पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षाचा अभ्यास सुरु केला. आपल्याला सक्षम व समाजपयोगी कार्य करायचे असेल तर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा देण्याचा त्याने निश्चय केला.

यासाठी तिने विद्येचे माहेरघर असलेले पुणे शहर गाठले. एक ते दीड वर्ष चांगला अभ्यास केल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाचे दोन वेळेस पेपर दिले. असता दोन राज्यसेवा फ्री पास नंतर मेन ची तयारी त्याने एमपीएससी कॉम्बिन पीएसआय परीक्षेत पहिल्या प्रयत्नात पास झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पुणे येथे लायब्ररीमध्ये स्वतः अभ्यास करून व. योग्य नियोजन करीत अभ्यास केला. याचे फळीत स्वरुपात त्याने पहिल्याच प्रयत्नात एमपीएससीच्या पोलीस उपनिरीक्षक पदी यश संपादन केले. आपल्या मुलाने यश पदरात पाडीत आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याच्या आनंदाने नानासाहेब जाधव व संजोकता जाधव दोघांच्याही डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते.

"वडिलांचे आर्थिक उत्पन्न अत्यंत कमी असल्याने लहानपणीच आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची निश्चय मी केलेला होता वडिलांनी थोडे थोडे पैसे पाठवून मला पुण्याला शिक्षणाला पाठवले त्यांची ही आर्थिक परिस्थिती बघून मी कोणताही क्लास लावलेला नाही स्वतः अभ्यास केला व एमपीएससीचा पेपर दिले व पहिल्याच प्रयत्नात पास झालो . आई-वडिलांचे मार्गदर्शन व शिक्षकांचे आशीर्वाद त्यामुळे मला यश मिळाले असून ‌पुढे मला डी वाय एस पी अधिकारी व्हायचे असून यासाठी परीक्षा देण्याचे ठरविले आहे."

- रोहित नानासाहेब जाधव, पोलीस उपनिरीक्षक पदी उत्तीर्ण

"सिन्नर चे माजी आमदार व सिन्नर भूषण स्व. नानासाहेब गडाख यांचा मुख्य हेतू हाच होता की विद्यार्थी हा उच्च शिक्षण घेऊन आपल्या महाराष्ट्राचे व देशाचे नाव तसेच आई-वडिलांचे नाव उंच स्थानी नेवो हाच मूळ हेतू स्वर्गीय नानासाहेब गडाख यांचा होता. माध्यमिक लोक शिक्षण मंडळाचे एस जी पब्लिक स्कूल येथे रोहितचे दहावीपर्यंत शिक्षण झाल्याने आम्हाला रोहितच्या यशाबद्दल अभिमान असून असेच विद्यार्थी आमच्याकडून घडो हे आमचे सतत प्रयत्न राहतील. आमच्या शाळेतील अनेक विद्यार्थी हे देश विदेशात तसेच आयएस अधिकारी असून हे सर्व शिक्षक व आई-वडिलांच्या मार्गदर्शनातून घडत आहे."

- अण्णासाहेब सूर्यभान गडाख, अध्यक्ष, माध्यमिक लोक शिक्षण मंडळ, सिन्नर

"लहानपणापासूनच रोहित हा हुशार असल्याने त्याला माध्यमिक लोक शिक्षण मंडळाचे एस जी पब्लिक स्कूल येथील शिक्षकांच्या मेहनतीमुळे त्याचा पाया पक्का झाला तसेच कोणतेही क्लास किंवा कोणाचे मार्गदर्शन न घेता त्याने पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक पदी यश मिळवल्याने आमचे कष्ट याचे चीज झाल्याचे आम्हाला आज आनंद वाटतो."

- नानासाहेब भगवान जाधव, वडील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT