Sub-Inspector of Police Kiran Deore with the trophies at the convocation ceremony esakal
नाशिक

PSI Success Story: कष्टाचे चीझ करत चषकावर मोहर! पोलिस दीक्षांत संचलनात उमराणेच्या ‘किरण’ला 3 पुरस्कार

योगेश सोनवणे

PSI Success Story : प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक यांच्या १२२ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ शनिवार (ता.५) रोजी नाशिक पोलिस अकादमीत पार पडला. या दीक्षांत संचलनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षका यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.

त्यात उमराणे येथील किरण देवरे यांना देखील तीन पुरस्काराने गौरविण्यात आले. (PSI Success Story Stamping cup by doing hard work 3 awards for Umrales Kiran in police convocation nashik)

उमराणे (ता. देवळा) येथील कांदा मार्केटमध्ये मापारी म्हणून काम करणाऱ्याचा मुलगा किरण हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत पोचला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी स्पर्धा परीक्षेचे टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केले.

सुरवातीपासूनच देवरे कुटुंबीयांची घरची परिस्थिती खुपच हलाखीची आणि बेताची होती. अशा परिस्थितीत देवरे कुटुंबाच्या नशिबी आयुष्यात खूप आव्हाने आलीत अन् आलेल्या प्रत्येक आव्हानाला तेवढ्याच हिमतीने तोंड देत किरणने प्रत्येकवेळी यश मिळविले.

१ ऑगस्ट २०२२ पासून प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक यांच्या १२२ व्या तुकडीचे प्रशिक्षण नाशिक येथे सुरु झाले होते. वर्षभराच्या कालावधी नंतर प्रशिक्षण संपले. प्रशिक्षणात विशेष कामगिरी केलेल्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

संपूर्ण प्रशिक्षण काळात आंतरवर्ग व बाह्यवर्ग अशा दोन परीक्षा होतात. आंतरवर्ग परीक्षेत भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रकिया संहिता, भारतीय पुरावा कायदा , तपास , सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, पोलिस यंत्रणा अशा विषयांचे पेपर घेतले जातात त्यात प्रथम येणाऱ्याला बेस्ट कॅडेट इन स्टडीज तर कायद्याच्या विषयात प्रथम येणाऱ्यास बेस्ट कॅडेट इन लॉ पुरस्काराने गौरविण्यात येते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आंतरवर्ग व बाह्यवर्ग या दोन्ही परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या कॅडेटला बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच पुरस्कार देण्यात येतो.

प्रशिक्षण कालावधीत घेण्यात आलेल्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल किरण देवरे यास ‘बेस्ट कॅडेट इन लॉ’, ‘बेस्ट कॅडेट इन स्टडीज’ तसेच सेकंड बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच या तीन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

"पोलिस अकादमीत बारा महिने खडतर व दर्जेदार प्रशिक्षण मिळाले. यामुळे आत्मविश्वास उंचावला आहे. पोलिस सेवेत लोकांच्या समस्या सोडविणे, गुन्ह्याचा शास्त्रशुद्ध पद्धतीने छडा लावणे हे माझे ध्येय राहणार आहे. माझे हे यश माझा भाऊ तुषार यास समर्पित करीत आहे."

किरण देवरे, पोलिस उपनिरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT