Murals created by students in the city to raise awareness of the issue. esaka
नाशिक

Ease of Living : भित्तिचित्रांतून नाशिक दर्शन; नाशिकची आगळीवेगळी ओळख!

विक्रांत मते

नाशिक : केंद्र सरकारच्या शहरी कामकाज मंत्रालयाकडून ‘इज ऑफ लिव्हिंग’ इंडेक्स सर्वेक्षण घेतले जाते. यंदाचे तिसरे वर्ष असून त्यासाठी सर्वेक्षण घेतले जाणार आहे. स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून सर्वेक्षणाच्या जनजागृतीसाठी शहरात विविध ठिकाणी भित्तिचित्रे रंगविली जात आहे. या माध्यमातून नाशिकची ओळख समोर आणली जात आहे. (Public awareness for Ease of Living survey View of Nashik Through Murals by smart city nashik news)

के‌. के वाघ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमाअंतर्गत भित्तिचित्रे साकारली आहेत. नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा, खाद्यप्रेमी नाशिककरांची आवडती मिसळ, सिटीलिंक कंपनीची बससेवा, कोविड वॉरिअर, मंत्रभूमी ते यंत्रभूमी व यंत्रभूमी ते आता तंत्र भूमीचा प्रवास, गोदाघाट आदी प्रकारची भित्तिचित्रे साकारण्यात आली आहेत.

भित्तिचित्रांच्या माध्यमातून ९ ते २३ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या राहणीमान सुलभता निर्देशांक सर्वेक्षणात (ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स) सहभागी होण्याचे आवाहन स्मार्टसिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी केले आहे. सर्वेक्षणात अकरा हजार नाशिककरांनी नाशिक शहराबाबत आपले मत नोंदविले आहे. मोहिमेत सहभागासाठी eol2022.org संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Score :असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

काय आहे सर्वेक्षणात?

- सर्वेक्षणात शहरासंदर्भात माहिती विचारण्यात आली आहे. प्रवासाची साधने, वीजपुरवठा, पाणीपुवठा, पाण्याची गुणवत्ता, परवडणाऱ्या आरोग्य सेवा, आरोग्य सेवांचा दर्जा, शिक्षणाच्या सुविधा, शैक्षणिक सुविधांच्या दर्जा, रोजगाराच्या संधी, शहरातील हवा प्रदूषणाची पातळी, स्वच्छतेबाबत अभिप्राय, मनोरंजनाच्या सुविधा, शहर सुरक्षित आहे का, शहरात राहण्यासाठी येणारा खर्च, महापालिकेशी संवाद, शहराची राहण्यासाठी शिफारस करणार का, आदी प्रकारचे प्रश्‍न विचारण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT