NMC News esakal
नाशिक

NMC News : Public Bicycle Sharing च्या 485 सायकली विद्यार्थ्यांना मिळणार; महापालिका शिक्षण मंडळाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : स्मार्टसिटी कंपनीकडून वाजतगाजत सुरू करण्यात आलेला पब्लिक बायसिकल शेअरिंग प्रकल्प बंद पडल्याने जवळपास ६५० पैकी ४८५ सायकल दुरुस्त करून महापालिकेच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्मार्टसिटी अभियानांतर्गत नाशिकमध्ये पाच वर्षांपूर्वी पब्लिक बायसिकल शेअरिंग प्रकल्प राबविण्यात आला. यासाठी महापालिकेने हिरो निऑन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीबरोबर करार केला. (Public Bicycle Sharing Students get 485 bicycles Decision of Municipal Board Education Allotment in first week of July Nashik News)

या प्रकल्पांतर्गत कंपनीने शहरात विविध ठिकाणी स्मार्ट स्टॅण्ड उभारत सायकली नागरिकांना उपलब्ध करून दिल्या. मात्र, नागरिकांचा अल्प प्रतिसाद आणि नियोजनाअभावी हा प्रकल्प बंद पडला. सदर प्रकल्प बंद पडल्यानंतर संबंधित कंपनीसमवेतचा करारही महापालिकेने रद्द केला.

त्यामुळे सदर प्रकल्पातील सायकली आडगाव येथील ट्रक टर्मिनस गोडाऊनमध्ये जमा करण्यात आल्या. जमा केलेल्या सायकली नादुरुस्त होऊन उपयोगात येत नसल्याने त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या शाळांमधील गोरगरीब विद्यार्थिनींना वाटप करण्याची मागणी माजी नगरसेवक अ‍ॅड. तानाजी जायभावे यांनी केली होती.

यासंदर्भात तत्कालीन शिक्षण प्रशासनाधिकारी व स्मार्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर स्मार्ट कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील लेखी पत्रही दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप होत नव्हती. ॲड. जायभावे यांच्या पाठपुराव्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन सायकलींची पाहणी केली.

जवळपास साडेसहाशे सायकल दुरुस्त करून महापालिकेच्या शाळांमधील गरजू विद्यार्थिनींना वापरण्याकरिता उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, त्यानंतरही गोडाऊनमधील सायकलची स्थिती लक्षात घेत ४८५ सायकल दुरुस्त करण्यात आल्या आहेत.

दरवर्षी सायकल देणार

गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप केल्यानंतर त्याची देखभाल व दुरुस्ती महापालिकेमार्फत करण्यात येईल. शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर सायकल जमा करून ओवर ऑइलिंग केले जाईल. त्यानंतर पुन्हा नवीन गरजू विद्यार्थिनींना वाटप केले जाणार आहे.

"नवीन शालेय वर्ष सुरू होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर ४८५ सायकल महापालिकेच्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळताना दिसत आहे."

- ॲड. तानाजी जायभावे, माजी नगरसेवक.

"स्मार्टसिटी कंपनीमार्फत सायकल उपलब्ध होतील. त्यानंतर विद्यार्थिनींना त्याचे वाटप केले जाईल."

- मिता चौधरी, प्रभारी शिक्षणाधिकारी, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT