CNG Pump sakal
नाशिक

Nashik News : इंधन निर्मितीत स्वयंपूर्णता कागदावरच! जिल्ह्यात सीएनजी वाहन संख्येच्या तुलनेत पंप कमीच

प्रमोद सावंत

Nashik News : केंद्र शासनाने इंधननिर्मितीच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचे धोरण अवलंबले आहे. या मागे पेट्रोल, डिझेल आदींचा वापर कमी करण्याचा हेतू आहे. त्यासाठी सीएनजी, एलपीजी, इलेक्ट्रिकल आदी पर्याय आहेत. या पर्यायांचा वापर सुरु झाला असला तरी या वाहनांच्या तुलनेत पायाभूत सुविधांचा अभाव आहे.

जिल्ह्यात सीएनजीची नोंदणीकृत १८ हजार ९१४ विविध प्रकारची वाहने असून नव्याने किट लावलेले अवैधरीत्या सीएनजी वापरणारे ८ ते १० हजार वाहने आहेत. ३० हजार वाहनांच्या तुलनेत जिल्ह्यात केवळ १९ सीएनजी पंप आहेत.

मागणी व पुरवठ्यात मोठी तफावत असल्याने वाहनधारकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. (Pumps are less compared to number of CNG vehicles in district nashik news)

जिल्ह्यात सीएनजी पंपांची संख्या वाढवितानाच गॅस पुरवठा करणाऱ्या सर्व कंपन्यांना परवाना द्यायला हवा, त्याबरोबरच जास्तीत जास्त इन्स्टॉलेशन सेंटर करून गॅस पाइपलाइन व ऑनलाइन पद्धतीने पुरवठा केला पाहिजे असे जाणकारांचे म्हणणे आहे. केंद्र व राज्य शासनाने सीएनजी, एनसीजी व इलेक्ट्रिकल वाहनांसाठी आवश्‍यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यासच इंधन निर्मितीत स्वयंपूर्णतेचे स्वप्न साकार होवू शकेल,अन्यथा हे धोरण कागदावरच राहील.

नाशिक व धुळे जिल्ह्यात सीएनजी पंपांना गॅस पुरवठा करण्याचा परवाना महाराष्ट्र गॅस लिमिटेड कंपनीकडे आहे. जिल्ह्यात हिंदुस्तान पेट्रोलियमचे (एचपीसीएल) १२ पैकी अवघे ४ सीएनजी पंप आहेत. भारत पेट्रोलियमचे (बीपीसीएल) १५ सीएनजी पंप असून हे सर्व पंप सुरु आहेत.

इंडियन ऑईलचे (आयओसीएल) ३ सीएनजी पंप असून हे सर्व पंप बंद आहेत. सीएनजीला सर्वत्र मोठी मागणी आहे, मात्र मागणीच्या तुलनेत अत्यल्प पुरवठा होत असल्याने ज्या पंपांवर सीएनजी उपलब्ध असतो तेथे नेहमी वाहनांच्या रांगा असतात. चार-पाच तास प्रतीक्षेनंतर गॅस मिळतो.

लिक्विड नॅचरल गॅस (एलएनजी) पासून सीएनजी तयार केला जातो. सीएनजी वाटपाचा कोटा केंद्र शासनाने नियंत्रित केलेला आहे. त्याच्या निर्मितीवर मर्यादा आहेत. वाडीवऱ्हे-विल्होळी येथे इन्स्टॉलेशन प्लांट आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सीएनजी मुबलक प्रमाणात मिळत नसल्याने गाड्यांच्या खरेदीचे प्रमाण कमी होऊ शकते. यामुळे काही ग्राहक पेट्रोल व सीएनजी अशा दोन्ही सुविधा असलेली वाहने खरेदी करत आहेत. सीएनजीचा पुरवठा थेट पाइपलाइनद्वारे (ऑनलाइन) झाल्यास पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल.

कसमादे, चांदवड, नांदगावसह सहा तालुक्यात महामार्गावरील वाके फाटा व वडाळीभोई या दोन ठिकाणी फक्त सीएनजी पंप आहेत. तालुक्यातील कृष्णा व दुसाने पेट्रोलियमवर सीएनजी पंपाचे सर्व काम झाले असताना पुरवठा होत नाही. शहरात एकही पंप नाही. शहरात एचपीसीएल च्या पाच पंपांवर सीएनजी पंप मंजूर झाले आहेत. मात्र काम सुरू होत नाही.

गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्या

अदाणी, गेल, अवंतिका, टोरंट, महाराष्ट्र गॅस, महानगर गॅस

पंपांची संख्या वाढवावी

सीएनजीला हरित गॅस संबोधले जाते. तेल विहिरी व कोळसा खाणींमध्ये मिथेन गॅस मिळतो. सीएनजीमध्ये ९० टक्के मिथेन व १० टक्के इथेन असते. हा गॅस प्रदूषण विरहित आहे. भविष्यातील सर्वाधिक उपयोगी इंधन म्हणून सीएनजीचा वापर वाढणार असताना सर्व्हिस सेंटर - पंप संख्या वाढणे आवश्‍यक आहे. वाहनाच्या अपघातात गॅस टाकी फुटल्यास मात्र सीएनजी धोकादायक आहे.

जिल्ह्यातील सीएनजी वाहनांची संख्या / वाहतुकीसाठीचे (ट्रान्स्पोर्ट)

बस - २१०

मालवाहतूक वाहने - १ हजार २१०

मोटर कॅब- ४०७

तीनचाकी मालवाहू - १९३

तीनचाकी प्रवासी रिक्षा - २ हजार ९९३

एकूण - ४ हजार ९५१

खासगी (नॉन ट्रान्स्पोर्ट)

कार - १३ हजार ९५२

ओमनी बस - १

तीन चाकी - १

दुचाकी - १

अन्य वाहने - ८

एकूण - १३ हजार ९६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT