court order esakal
नाशिक

Nashik Accident Case: अपघातास कारणीभूत चालक युवतीला शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भरधाव दुचाकी चालवितांना रस्‍त्‍यावरुन पायी जात असलेल्या दोघा महिलांना धडक देत जखमी केल्याप्रकरणी चालक युवतीस न्‍यायालयाने कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावत जखमींना भरपाई देण्याचे आदेश दिले. (Punishment for driver girl who caused accident Nashik)

२९ ऑगस्‍ट २०१८ मध्ये दिंडोरी रोडवरील म्‍हसोबा मंदिर परिसरात हा अपघात झाला होता. पंचवटी पोलिस ठाण्यात या अपघातासंबंधी गुन्‍हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी देवयानी गायकवाड (वय १९ वर्षे, रा. आरटीओ कार्यालयाजवळ, पेठरोड) हिने दुचाकीवरुन जात असताना पायी जाणाऱ्या दोघा महिलांना धडक दिली होती. या अपघातात जखमी झाल्या होत्या. महिलांच्‍यावतीने जयश्री संगमनेरे यांनी फिर्याद दिली होती.

गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार टी. एस. झाडे यांनी केला असून त्यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा केले. व गुन्हा शाबीत होण्याचे दृष्टीने मेहनत घेऊन चिकाटीने तपास केला. आरोपीविरुद्ध मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्‍या खंडपीठासमोर दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्याची सुनावणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी येथे सुरू होती. शुक्रवारी (ता.५) अतिरिक्‍त मुख्य न्‍यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांनी फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली.

खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून एस. एस. चिताळकर यांनी कामकाज पाहिले. तसेच पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार एम. ए. खंबाईत, पोलिस शिपाई पी. पी. गोसावी यांनी पाठपुरावा केला.

अशी सुनावली शिक्षा

रस्‍त्‍याच्‍या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालविल्‍याबद्दल तसेच अपघातात इतरांना दुखापत पोचविण्यास कारणीभूत ठरणे, स्‍वतःसह इतरांचा जीव धोक्‍यात येईल अशा पद्धतीने वाहन चालविल्‍याच्‍या प्रकारात एकूण साडेतीन हजार रुपये दंड व कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली.

तसेच अपघातात जखमी झालेल्‍यांना २५ हजार रुपये भरपाई देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजूर

SCROLL FOR NEXT