NMC Nashik News esakal
नाशिक

NMC News: महापालिकेच्या चालढकल योजनेला ‘ब्रेक’! ‘एन-कॅप’ योजनांना 3 महिन्यांचा अल्टिमेटम

सकाळ वृत्तसेवा

NMC News : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम ‘एन-कॅप’ अर्थात नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅमअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पांची संथगती लक्षात घेता केंद्र सरकारने आता तीन महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे.

या कालावधीत प्रकल्प पूर्ण न झाल्यास निधी परत जाण्याची शक्यता असल्याने महापालिकेची आता कसोटी आहे. ‘एन-कॅप’ अंतर्गत पन्नास इलेक्ट्रिक बस खरेदीवर फुली मारल्याने त्या निधीतून अन्य प्रकल्प राबवावे लागणार आहे. (purchase of 50 electric buses under NCap been overturned other projects will to be implemented from fund nashik nmc)

केंद्र सरकारने हवा शुद्धीकरणासाठी नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम घोषित केला आहे. त्यात हवा प्रदूषण रोखणे व त्या माध्यमातून २०२४ पर्यंत देशभरातील १३२ शहरांमधील प्रदूषण पातळी ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे नियोजन आहे.

विकसनशील नाशिकमध्येदेखील प्रदूषणाची पातळी घसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने नाशिक शहराचा योजनेत समावेश केला आहे. मागील तीन वर्षात महापालिकेला जवळपास १०० कोटींहून अधिक निधी प्राप्त झाला आहे.

हवा शुध्द करण्यासाठी प्रकल्प राबवायचे आहे. पहिल्या वर्षी वीस, तर दुसऱ्या वर्षी चाळीस कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. महापालिकेकडून ‘एन-कॅप’ अंतर्गत विविध उपक्रमांची घोषणा करण्यात आली असली तरी प्रकल्पांची गती अगदी संथ आहे.

स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक महापालिकेला शंभर मानांकनाच्या पुढे फेकणारा बांधकाम साहित्य विल्हेवाट प्रकल्पाची घोषणा होऊन दोन वर्षे उलटले तरी अद्यापही प्रकल्पाच्या कामाला सुरवात झाली नाही.

पन्नास इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा प्रस्ताव गुंडाळला जाणार आहे. प्रदूषणमुक्त व स्वच्छ शहर स्पर्धेला चालना देण्यासाठी महापालिकेमार्फत खरेदी करण्यात आलेली चार यांत्रिकी झाडू सप्टेंबरअखेर ताफ्यात दाखल होतील.

यातून प्रतिदिन १६० किलोमीटरचे रस्ते झाडले जाणार असल्याचा दावा केला आहे. पंचवटी, सिडको व नाशिक अमरधाममध्ये विद्युतदाहिनी बसविण्याचे काम प्रगतिपथावर आहे.

शहरातील ११३ सार्वजनिक शौचालयांवर १ ते ३ वॅटचे सौरऊर्जा पॅनेल बसविण्याचे काम सुरू आहे. शहरात १०६ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी तीनदा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली, परंतु अपेक्षित प्रतिसाद मिळतं नसल्याने प्रक्रिया रखडली आहे.

पूर्ण झालेले प्रकल्प

हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी वडाळा- पाथर्डी रोडवरील गुरुगोविंदसिंग स्कूल, गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालय व पंचवटी विभागातील हिरावाडीतील नाट्यगृहाजवळ हवा गुणवत्ता नियंत्रण केंद्र उभारण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

इलेक्ट्रिक बस खरेदीला ब्रेक

‘एन-कॅप’ अंतर्गत पन्नास इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु यापूर्वी ज्या महापालिकांना इलेक्ट्रिक बस खरेदी करायची आहे. त्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहे. बसचे उत्पादन नाही. महापालिकेने आता ऑर्डर दिली तरी किमान दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.

होऊ द्या खर्च

शहरात जवळपास ३५४ घंटागाडी चालविल्या जातात. घंटागाड्यांबद्दल तक्रारी असताना आता त्याच गाड्या संरक्षित करण्यासाठी पार्किंगच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जात आहे. घंटागाडीचे मुळ मालक ठेकेदार आहे.

मालमत्ता सुरक्षित ठेवण्याची जबाबदारीदेखील ठेकेदारांचीच असताना ती वाहने चोरी जाऊ नये यासाठी ‘एन-कॅप’चा निधी सीसीटीव्ही बसविण्यासाठी वापरला जाणार आहे. विशेष म्हणजे हवा गुणवत्ता सुधार कार्यक्रमाचा व घंटागाडी पार्किंग स्थानावर सीसीटीव्ही बसविण्याचा काहीच संबंध नाही.

योजनेंतर्गत प्रस्तावित प्रकल्प

- हवा गुणवत्ता नियंत्रण.

- निरीक्षण नोंदविण्यासाठी हवामान केंद्र उभारणे.

- विद्युतदाहिनी बसविणे.

- बांधकाम डेब्रिज विल्हेवाट प्रकल्प.

- दुभाजकांमध्ये शोष वनस्पती.

- एकीकृत सिग्नल प्रणाली.

- सुलभ शौचालयांवर सोलर रुफ टॉप बसविणे.

- रस्ते झाडण्यासाठी यांत्रिकी झाडू. (रोड स्वीपर)

- जलसंवर्धन उपक्रम व रेन वॉटर हार्वेस्टिंग.

- सौर ऊर्जेवर चालणारे दिवे बसविणे.

- इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पॉइंट उपलब्ध करून देणे.

- घंटागाड्यांच्या सुरक्षेसाठी पार्किंग स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे.

"‘एन-कॅप’ योजनेंतर्गत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महापालिकेला तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत प्रकल्प पूर्ण करू." -डॉ. अशोक करंजकर, आयुक्त, महापालिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Video: मनपाचा ट्रक पडला २५ फूट खड्ड्यात..! पुण्यातल्या सिटी पोस्ट परिसरातील विचित्र घटना

IND vs BAN 1st Test : Virat Kohli वर रोहित वैतागला; 'तो' एक निर्णय ज्याने अम्पायरही चकित झाले

Latest Marathi News Updates : तारापूर एमआयडीसी कंपनीमध्ये भीषण स्फोट! पाच ते सहा जण जखमी

IND vs BAN Test, 2nd Day: गोलंदाजांमुळे पहिल्या कसोटीत भारताने वर्चस्व गाजवले, पण Rohit - Virat च्या अपयशाने टेंशन वाढवले

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

SCROLL FOR NEXT