fraud Crime News esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : जागामालकाचा बनाव रचुन खरेदी पडली महागात!; संशयितास अटक

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : जागामालक विदेशात राहतात, याचा फायदा उचलून बनावट जागामालक उभा करून व बनावट कागदपत्र तयार करत जागा परस्पर नावावर केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, एका संशयितास अटक करण्यात आली आहे. (purchase of land by fraud owner Suspect arrested Nashik Latest Crime News)

फिर्यादी शरद कचेश्वर दवंगे (रा. म्हसरूळ, नाशिक) हे २१ ऑक्टोबरला दुपारी सिडकोतील सहदुय्यम निबंधक वर्ग- २ कार्यालयात त्यांच्या स्वतःच्या कामासाठी आलेले असताना गट नंबर ५३/१/१ एकूण क्षेत्र ००. ९७ आर. ही मिळकत खरेदी करण्यासाठी संशयित धीरज रमेश नन्नावरे दस्तनोंदणीचे काम करीत होते. या वेळी मूळ जागामालकाऐवजी नन्नावरे यांनी बनावट जागामालक म्हणून शीतलकुमार पाटील, तसेच गुप्ता यांना उभे करून स्वतःच्या नावाने १६ लाख ६० हजार रुपयांत खरेदी करून शासनाची फसवणूक केली. संशयित धीरज नन्नावरे, शीतलकुमार पाटील व गुप्ता यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार , GRAP-4 लागू...

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT