नाशिक : चावी बनवून देणाऱ्याला घरात बोलावणे एका महिलेस चांगलेच महागात पडले आहे. संशयिताने त्यांच्या घरात घरफोडी करीत कपाटातील रोकडसह दागिने, असा ६६ हजाराचा ऐवज लांबविला.
त्यामुळे चावी चक्क ६६ हजाराला पडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सातपूर कॉलनीत हा प्रकार उघडकीस आला. ललिता बाळासाहेब अहिरे (रा. सातपूर कॉलनी) यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Purpose Make a Duplicate key women invite key maker in home key maker do burglary and lumps 66 thousand cash and jewellery Nashik Crime News)
अहिरे यांच्या घरातील लोखंडी कपाटाची चावी काही दिवसापासून सापडत नसल्याने त्यांनी एकाला चावी करण्यासाठी घरात बोलावले होते. गेल्या २२ ऑक्टोबरला ही घटना घडली. दुपारी गल्लीतून कुलूप दुरुस्ती करून मिळेल, चावी बनवून मिळेल असा आवाज देत चाललेल्या व्यक्तीला त्यांनी घरात घेतल्याने ही घटना घडली.
अहिरे यांनी बेडरूममधील लोखंडी कपाट दाखवत भामट्यास ते उघडण्यास सांगितले. या वेळी त्याने चावी बनविण्याचा बहाणा करीत कपाट उघडून तिजोरीत ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र, कानातील झुमके, वेलजोड आणि १६ हजाराची रोकड, असा ६६ हजाराचा ऐवज लांबविला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.