Congress NCP Shivsena sakal
नाशिक

Nashik Politics News : पक्ष फुटीमुळे जिल्हा परिषद गटांमध्ये राजकीय गुंता; इच्छुक पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अगोदर शिवसेनेत, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत कोणत्या गटाकडून निवडणूक लढवावी, असा प्रश्न इच्छुकांमध्ये निर्माण झाला आहे. राजकीय नेत्यांच्या दौऱ्यामुळे होत असलेल्या फलकबाजीत अनेक माजी सदस्य आघाडीवर दिसत आहेत.

‘राष्ट्रवादी’त उपमुख्यमंत्री अजित पवार गटात गेलेले खासगीत शरद पवार हेच आमचे दैवत आहेत, असे सांगत असल्याने अन निवडणुका लांबणीवर पडत असल्याने येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांच्या इच्छुकांपुढे राजकीय गुंता वाढणार आहे. (question among aspirants to which group should contest elections in upcoming Zp elections nashik politics news)

जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे वर्चस्व राहिले आहे. गत पाच वर्षांत सर्वपक्षीय व महाविकास आघाडीची सत्ता राहिली. यंदा निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी पुन्हा सत्तेत येईल, अशीच परिस्थिती राहील, असे वाटत असतानाच राज्यातील सत्तानाट्यात अजित पवार भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत सहभागी झाल्याने येणाऱ्या निवडणुकीत काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.

गत पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे १८ सदस्य निवडून आले होते. यातील जिल्हा परिषदेचे बहुतांश माजी सदस्य हे अजित पवार व छगन भुजबळ यांच्याबरोबर असल्याचे जाहीर सांगत असले, तरी खासगीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याच सोबत असल्याचे सांगतात. काहींनी उघडपणे शरद पवार यांच्याबरोबर राहणे पसंत केले आहे.

एक वर्षापूर्वी शिवसेनेतही दोन गट पडले. या फुटीनंतर शिवसेनेचेही माजी सदस्य दोन्ही गटांत विखुरले गेले आहेत. गत पंचवार्षिकमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक २५ सदस्य निवडून आले होते. यातील बहुतांश सदस्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहणे पसंत केले आहे. काहींनी ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पालकमंत्री दादा भुसे यांनी गटाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देत ते कार्यकर्त्यांना बळ देत आहेत. मात्र, शिवसेना असो वा राष्ट्रवादी. दोन गट झाल्याने पक्षांची ताकद दोन गटांत विभागली गेल्याने सदस्य संख्येवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

गत पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषदेवर सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळाल्याने भाजपने राज्यात सत्तेत आल्यापासूनच आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम सुरू केले आहे. ग्रामविकासमंत्री व पालकमंत्री गिरीश महाजन हे ग्रामविकासच्या माध्यमातून माजी सदस्यांना निधी देत ताकद देत आहेत.

यामुळे ग्रामीण भागात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काँग्रेसशी ताकद जिल्ह्यात कमी झाली. असे असतानाही गत पंचवार्षिकमध्ये काँग्रेसला सत्तेत सहभागी होता आले. संघटन कमजोर असले, तरी काँग्रेसने ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

उमेदवारीवरून रस्सीखेच

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप, शिवसेनेची तालुका-तालुक्यांत आपापली स्वतःच्या कार्यकर्त्यांची फळी आहे. मात्र, राज्यातील सत्तांतरामुळे भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्र आल्याने कुणाला कुठे उमेदवारी द्यावी, यावरून रस्सीखेच निर्माण होईल. तसेच, या युतीमुळे मोठ्या प्रमाणात गटबाजी, उमेदवारी नाकारलेले प्रबळ उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) या पक्षांकडे जाण्याची शक्यता आहे.

गत पंचवार्षिकमधील पक्षीय बलाबल

राष्ट्रवादी कॉंग्रेस : १८
काँग्रेस : ८
शिवसेना : २५
भाजप : १५
माकप : ३
अपक्ष : ४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahavikas Aghadi advertisement: महाविकास आघाडीच्या जाहिरातीवर ब्राम्हण समाजाचा तीव्र आक्षेप; बंदी आणण्याची मागणी

'बिग बॉस १८' मध्ये सलमानने घेतली अश्नीर ग्रोवरची शाळा; दोगलापन वाल्या डायलॉगवर भाईजान नाराज

Rahul Gandhi : शेतकरी हितासाठी ‘मविआ’ कटिबद्ध...राहुल गांधी : सोयाबीनला सात हजार रुपये भाव देऊ

Nepal Tourist Places: नेपाळमधील 'ही' पाच ठिकाणे आहेत नयनरम्य, अनेक पर्यटकांनाही नसेल माहिती

Google Spam Detection Tool : ट्रूकॉलरला टक्कर द्यायला गुगलने आणलं नवं फीचर, तुमच्या फोनमध्ये कसं वापराल? वाचा

SCROLL FOR NEXT