Radhakrishna Vikhe Patil : लाचखोरीला पायबंद घालण्यासाठी जनतेला तक्रारी करता याव्यात म्हणून पोर्टल सुरू करण्याचा विचार आहे, असे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सोमवारी (ता. ७) येथे सांगितले. (Radhakrishna Vikhe Patil said about plan to start portal to stop bribery nashik news)
मुंबईहून नगरकडे जाताना रात्री नाशिकमध्ये श्री. विखे-पाटील आले होते, त्या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की महसूल सप्ताह असताना नाशिक तहसीलदारांच्या लाचखोरीचं प्रकरण घडलं.
अशा घटना शरमेने मान खाली घालायला लावतात. त्यामुळे लाचखोर अधिकाऱ्यांना पुन्हा मूळ सेवेत देण्याऐवजी ‘साइड पोस्ट’ला दिले पाहिजे. लाचखोरीला प्रतिबंधासाठी पोर्टल तयार करण्याबाबत आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलणार आहोत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नव्हतो
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कथित भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे तुमचं मुख्यमंत्रिपद दूर जातंय असं वाटतंय का? या प्रश्नावर ते म्हणाले, ‘मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नव्हतो.
मग जयंत पाटील यांचे तुम्ही स्वागत करणार का? यावर पक्षात एकटा पडलो, असे कदाचित जयंत पाटील यांना वाटत असावे, त्यांचे स्वागत असेल. भाजपविषयी उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याविषयी ठाकरेंनी बोलताना विचार करावा, असेही श्री. विखे पाटील म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.