Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil felicitating Deputy Editor of Dai.Sakaal Prashant Kotkar at the Journalist Award Ceremony organized by Nashik City Journalists Association. esakal
नाशिक

Nashik News: माध्यमांनी वास्तवाचे भान राखून विश्वासार्हता जपावी : राधाकृष्ण विखे-पाटील

पत्रकार दिनानिमित्ताने नाशिक शहर पत्रकार संघाच्या वतीने उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विविध उपक्रमांत सहभागी झालेल्या पत्रकारांचा महसूलमंत्री विखे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बदलत्या काळात माध्यमांनी स्वतःची आचारसहिंता तयार करून नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान व स्पर्धेच्या युगात माध्यमांची साधणे बदललेली असली तरी, माध्यमांची ध्येय बदललेली नाहीत.

यासाठी लेखणीची धार कमी होऊ न देता पत्रकारांनी तत्परता, वस्तुनिष्ठ माहिती आणि वास्तवाचे भान ठेवून आपली विश्वासार्हता जपली पाहिजे, असे आवाहन राज्याचे महसूल व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. (Radhakrishna Vikhe Patil statement at felicitation ceremony organized by Nashik City Journalist Association Nashik News)

मविप्र संस्थेच्या कर्मवीर अॅड. बाबूराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिक महाविद्यालयाच्या सभागृहात सोमवारी (ता. ८) पत्रकार दिनानिमित्ताने नाशिक शहर पत्रकार संघाच्या वतीने उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विविध उपक्रमांत सहभागी झालेल्या पत्रकारांचा महसूलमंत्री विखे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर मविप्रचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेचे संचालक अंजिक्य वाघ, ज्येष्ठ पत्रकार चंदुलाल शहा, ‘दिव्य मराठी’चे सल्लागार संपादक जयप्रकाश पवार, ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर, ‘पुण्यनगरी’चे संपादक किरण लोखंडे, ‘लोकमत’चे संपादक मिलिंद कुलकर्णी, ‘आपलं महानगर’चे संपादक हेमंत भोसले, ‘पुढारी’चे संपादक मिलिंद सजगुरे आदी उपस्थित होते.

विखे- पाटील पुढे म्हणाले, की समाजात राज्यकर्त्यांप्रमाणे पत्रकारांनी एक भूमिका घेऊन काम करण्याची आवश्यकता आहे. प्रिंट माध्यमांना इलेक्ट्रॉनिकचे, इलेक्ट्रॉनिकला सोशल मीडियाचे, तर सोशल मीडियाला डिजिटल माध्यमाचे आवाहन उभे राहिले आहे.

मात्र, यातही प्रिंट माध्यमांची विश्वासार्हता टिकून आहे. वृत्तपत्र वाचणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. पाणी, शेती, आरोग्य यांसारख्या विषयांवर आजही चांगले लिखाण सुरू आहे. त्यामुळे लेखणीची ताकद कोणीही नाकारू शकणार नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

डॉ. रनाळकर यांनी प्रास्ताविकात पत्रकारांचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे सांगत, या प्रश्नांचे फोलोअपमध्ये कमी पडत असल्याचे सांगितले. तसेच पत्रकारांचे आरोग्य, अधिस्वीकृतीधारक पत्रकार व उपेक्षित पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांवरही त्यांनी प्रकाशझोत टाकला.

उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते विविध दैनिकांमधील पत्रकारांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पत्रकार संघाचे ज्ञानेश्वर वाघ यांनी आभार मानले. कार्यक्रमास पत्रकार संघाचे अध्यक्ष संपत देवगिरे, विक्रांत मते, श्याम बागूल, संजय पाठक, विनोद पाटील, आसिफ सय्यद, नीलेश अमृतकर आदी उपस्थित होते.

...यांचा झाला गौरव

उपवृत्त संपादक प्रशांत कोतकर (सकाळ), अनिल पवार (महाराष्ट्र टाइम्स), सुयोग जोशी (लोकमत), संजय भड (दिव्य मराठी), नीलेश अलई (नवराष्ट्र), सोमनाथ ताकवले (देशदूत), अतुल भांबेरे (पुण्यनगरी), वैभव कातकाडे (पुढारी), गोरख काळे (गांवकरी), कुंदन राजपूत (लोकनामा), सुशांत किरवे (आपलं महानगर), प्रशांत निरंतर (भ्रमर), नीलेश तांबे (छायाचित्रकार).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : संविधानावर बोलताना राहुल गांधींचा माईक झाला बंद, सुरु होताच म्हणाले, कितीही प्रयत्न करा, पण...

Potato : सर्वांच्या लाडक्या बटाट्याचा जन्म भारतातला नाहीच ! बटाट्याच्या भाजीच्या अनेक पद्धती काय ? जाणून घ्या आरोग्याचे फायदे

Pan Card Update : महत्त्वाची बातमी! बंद होणार जुने पॅनकार्ड, जाणून घ्या नव्या पॅन कार्डसाठी किती खर्च येईल

Farmers Income: शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची नवी योजना; शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 20,000 रुपये

IPL Auction: १३ वर्षीय Vaibhav Suryavanshi साठी राजस्थानने का मोजले १ कोटी! द्रविडने सांगितलं कारण; वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT