Nashik Hemant Godse : पक्षविरहीत मैत्रीचा काळ राजकारणात सध्या इतिहास जमा झाला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर तर दोन पक्षांमधील आणि नेत्यांमधील रेषा अधिक गडद झाल्या आहेत. मात्र शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसमधील नेत्यांच्या मैत्रीची चर्चा सध्या नाशिकमध्ये रंगत आहे.
खासदार हेमंत गोडसे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात अनेक ठिकाणी शुभेच्छापर होर्डिंग लागले आहेत. (rahul dive birthday wishes to hemant godse nashik news)
बऱ्याचशा होर्डिंगवर काँग्रेसचे माजी नगरसेवक राहुल दिवे यांचेही फोटो झळकत आहे, त्यामुळे पक्षाच्या वाटा वेगळ्या झाल्या तरीदेखील मैत्रीची झलक या होर्डिंगमधून लोकांना पाहायला मिळत आहे. दोघांमधील ही मैत्री ही पुन्हा राजकीय पातळीवर जुळेल का, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
राजकारणात कुणी कुणाचा कायमस्वरूपी शत्रू अथवा मित्र नसतो, हे अलीकडे दिसून आलेले आहे. त्यामुळे दोन विरुद्ध विचारधारा असलेल्या पक्षांचे नेते, पदाधिकारी जर एकाच होर्डिंग दिसू लागले, तर राजकीय खमंग चर्चा होणे स्वाभाविक आहे. कोणीही नेता कुठल्याही तंबूत शिरू शकतो, हे जनतेने पाहिलेले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यामुळे माजी नगरसेवक राहुल दिवे यांच्या मनात काय चालले आहे, अशी चर्चा सध्या परिसरात रंगत आहे. विशेष म्हणजे राहुल दिवे यांचे मोठे बंधू प्रशांत दिवे हे शिवसेना ठाकरे गटात आहेत. शिवसेनेतील मोठ्या फुटीनंतरहीदेखील त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली नाही.
गोडसे हे शिंदे गटातील खासदार असून, काँग्रेसचा प्रमुख विरोधक असलेला भाजपसोबत आहेत. त्यामुळे राहुल दिवे आणि खा. गोडसे हे मैत्रीच्या निमित्ताने भविष्यातील संधी चाचपडत आहेत का, अशा अंगानेही चर्चा सुरू आहे.
नेमके काय चालले आहे?
राजकीय वर्तुळात अशी चर्चा होत असताना संबंधित नेते मंडळींची सर्वसाधारणपणे एकच प्रतिक्रिया असते. पक्ष भिन्न असले तरी व्यक्तिगत हितसंबंध जपले जायला हवेत. पण कारण काहीही असले तरी नाशिक रोड विभागात मात्र गोडसे व दिवे यांच्यात नेमके काय चालले आहे, याची चर्चा कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये निश्चितच होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.