Rahul Gandhi  esakal
नाशिक

Rahul Gandhi Nashik : राहुल गांधी नाशिकमध्ये फुंकणार लोकसभा निवडणुकीचे रणशिंग; अनंत कान्हरे मैदानावर होणार सभा

राहुल गांधीही पंचवटीतील ऐतिहासिक काळाराम मंदिराला भेट देणार असून, रामतीर्थ येथे आरती करणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Rahul Gandhi Nashik : काँग्रेसला हिंदूविरोधी असे ठसविण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला. यातच अलीकडच्या काळातील भाजपच्या प्रखर हिंदुत्वाच्या राजकारणात काँग्रेस अस्तित्वहीन होत चालली आहे.

यातून सावरण्यासाठी काँग्रेसनेही सॉफ्ट हिंदुत्वाची कास धरली आहे. (Rahul Gandhi will blow Lok Sabha election meeting in Nashik News)

मात्र, त्यांचा फारसा फायदा झाला नाही. सध्या देशात अयोध्यातील श्रीराम मंदिरामुळे वातावरण राममय झालेले असल्याने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनीही सत्तेचा वनवास संपविण्यासाठी प्रभू श्रीराम वनवासात राहिलेल्या नाशिकची निवड केली आहे. राहुल गांधी नाशिक दौऱ्यावर येत असून, ते शहरातील अनंत कान्हरे मैदानावर जाहीर सभा घेणार आहेत.

राहुल गांधीही पंचवटीतील ऐतिहासिक काळाराम मंदिराला भेट देणार असून, रामतीर्थ येथे आरती करणार आहेत. कालिका मंदिर भेटचाही समावेश ‘भारत जोडो न्याय’ यात्रेत होण्याची शक्यता आहे. ‘भारत जोडो न्याय यात्रा’ अंतिम टप्प्यात नाशिकमधून जाणार असून, वरील ठिकाणांचा त्यात समावेश करण्याबाबत स्थानिक काँग्रेसकडून प्रस्ताव देण्यात आला आहे.

त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ राहुल गांधी यांनी दिल्ली गाठण्यासाठी नाशिकची वाट धरली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या टप्प्यातील ‘भारत जोडो यात्रा’ मणिपूरमधून सुरू झाली असून, सध्या ती आसाममध्ये पोचली आहे. मार्चच्या प्रारंभी ही यात्रा नाशिकला पोचणार आहे. या यात्रेचा समारोप मुंबईला होईल. याबाबत सध्या राहुल गांधी यांच्या कार्यक्रमांचे नियोजन सुरू आहे.

यात्रेचा शेवटचा टप्पा मुंबई असून, नाशिकमधून ही यात्रा मार्गक्रमण होणार आहे. प्रदेश काँग्रेस या यात्रेत खासदार गांधी यांनी ऐतिहासिक काळाराम मंदिराला भेट देण्यासह गोदा आरती व कालिका मंदिराला भेटीचे नियोजन केले आहे. याशिवाय त्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नसली तरी, सकारात्मक संकेत देण्यात आले आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येपूर्वी नाशिकमधील काळाराम मंदिराला भेट देत गोदावरीची आरती केली होती. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे य‍ांनीही काळाराम मंदिरात दर्शन घेत रामतीर्थावर आरती केली. तसेच अनंत कान्हरे मैदावर सभा घेत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. त्यापाठोपाठ खासदार राहुल गांधीही काळारामचरणी लीन होत गोदामाईचा आशीर्वाद घेणार आहेत. याकरिता काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू आहे.

दिवंगत इंदिरा गांधी यांनी घेतले होते दर्शन

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी यापूर्वी अध्यक्ष असताना काळाराम मंदिराला भेट दिली आहे. आता राहुल गांधी हे काँग्रेसचे असे दुसरे नेते ठरतील, जे नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतील. दुष्काळकाळात माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी जिल्हा दौऱ्यावर आले होते. मात्र, त्यांनी शहराला भेट दिली नव्हती. त्यामुळे राहुल गांधी यांच्या या दौऱ्याची राजकीयदृष्ट्या काँग्रेसने हे साधलेले ‘टायमिंग’देखील चर्चेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT